आषाढी एकादशीनिमित्ताने पुण्यात रताळ्याची २५ ट्रक आवक

पुणे बाजारसमितीतील आवक
पुणे बाजारसमितीतील आवक

पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. २२) परराज्यांसह राज्याच्या विविध भागांतून भाजीपाल्याची सुमारे १७० ट्रक आवक झाली हाेती. आज (साेमवारी, ता. २३) आषाढी एकादशी असल्याने त्यानिमित्ताने कर्नाटकसह साेलापूर, मलकापूर भागांतून रताळ्याची सुमारे २५ ट्रक आवक झाली हाेती.

परराज्यांतून हाेणाऱ्या आवकेमध्ये प्रामुख्याने कर्नाटकातून सुमारे ६ टेंपाे मटारची, इंदूरहून सुमारे २ टेंपो गाजराची, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून ८ टेंपो शेवग्याची, १५ टेंपो हिरवी मिरचीची, कर्नाटकातून २ टेंपो ताेतापुरी कैरीची, तसेच सुमारे ५ ट्रक काेबीची आवक झाली हाेती.

स्थानिक आवकेमध्ये सातारी आलेची सुमारे अडीच हजार गाेणी, टोमॅटोची सुमारे ४ हजार क्रेट, फ्लॅावरची १५, तर काेबीची सुमारे १० टेंपो, भुईमूग शेंगांची सुमारे २०० पोती, सिमला मिरचीची १२ टेंपो, भेंडीची १२, गवारीची सुमारे १० टेंपो, हिरवी मिरचीची ५ टेंपाे, पावटाची ८ टेंपाे, तांबडा भाेपळ्याची १२ टेंपाे, काकडीची १० टेंपाे आवक झाली हाेती. कांद्याची सुमारे ७० ट्रक तर आग्रा, इंदूर, तळेगाव व नाशिक बटाट्याची सुमारे ४० ट्रक आवक झाली. मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे साडेचार हजार गोणींची आवक झाली हाेती.

फळभाज्यांचे दर (प्रति दहा किलो)  कांदा : १२०-१४०, बटाटा : १५०-२२०, लसूण : १५०-३००, आले सातारी : ३५०-४००, भेंडी : २००-३००, गवार : गावरान व सुरती २००-३००, टोमॅटो : १५०-१८०, दोडका : २५०-३००, हिरवी मिरची : ३००-३५०, दुधी भोपळा : ६०-१२०, चवळी : १५०-२००, काकडी : ६०-१२०, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी : १८०-२००, पापडी : २००-२२०, पडवळ : १५०-१६०, फ्लॉवर : ८०-१२०, कोबी : ८०-१२०, वांगी : १५०-२५०, डिंगरी : १६०-१८०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : ३००-३५०, तोंडली : कळी २२०-२४०, जाड : १००-१४०, शेवगा : ३००-४००, गाजर : २००-२५०, वालवर : २५०-३००, बीट : १००-१४०, घेवडा : ४००-५००, कोहळा : १४०-१६०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : १३०-१५०, ढेमसे : २५०-३००, मटार : परराज्य : ४००, पावटा : २००-२५०, भुईमूग शेंगा - ३००-३५०, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : २४०-२५०, मका कणीस : ६०-१२० (१०किलो) नारळ (शेकडा) : १०००-१६००, रताळी कर्नाटक १२०-१६०, स्थानिक २००-२५०.

पालेभाज्यांचे दर (शेकडा) पालेभाज्यांमध्ये काेथिंबीरीची सुमारे पावणे दाेन लाख तर मेथीची सुमारे ८० हजार जुड्या आवक झाली हाेती. कोथिंबीर : २००-५००, मेथी : ३००-६००, शेपू : ३००-५००, कांदापात : ५००-१०००, चाकवत : ४००- ५००, करडई : ३००-५००, पुदिना : ३००-५००, अंबाडी : ३००-४००, मुळे : ५००-१०००, राजगिरा : ४००-५००, चुका : ३००-६००, चवळई : ३००-५००, पालक : ३००-५००.

फळबाजार फळ विभागात रविवारी (ता. २२) मोसंबीची सुमारे २० टन, संत्र्याची २०० किलो, डाळिंबाची ४० टन, पपईची १० टेंपोे, लिंबांची सुमारे ३ हजार गोणी, चिकूची ७०० गाेणी, पेरूची ५०० क्रेट्स, कलिंगडाची २० टेंपो, खरबुजाची ६ टेंपो, सीताफळाची ३ टन इतकी आवक झाली हाेती.  फळांचे दर : लिंबे (प्रति गोणी) : ५०-११०, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : (३ डझन) : ९०-२००, (४ डझन) : ४०-१००, संत्रा : ( ३ डझन) २८०-५५०, (४ डझन) : १५०-२८०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-७०, गणेश ५-२०, आरक्ता १०-४०. कलिंगड : ३-८, खरबूज : १०-२०, पपई  : ५-२५, चिकू : १००-४५०, पेरू (२० किलो) : ३००-५००, सीताफळ : १०-१४०.

पावसामुळे फुले भिजल्याने फुलबाजारात रविवारी विविध फुलांच्या आवकेत घट झाल्याने दरात वाढ झाली हाेती. गुरुपाैर्णिमेपर्यंत फुलांना मागणी राहणार असल्याने दर तेजीत राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

फुलांचे दर (प्रति किलो) : झेंडू - ३०-४०, गुलछडी - १००-१२०, तेरडा ५०-६०, बिजली ८०-१२०, कापरी ३०-४०, सुटा कागडा -३००, शेवंती १००-१२०, माेगरा ३००-४००, ॲस्टर (चार गड्ड्यांचे दर) १६-२०, गलांड्या १०-१२, गुलाब गड्डी १०-१५, ग्लॅडिएटर १४-१६, गुलछडी काडी २०, (बारा नगांचे दर) गुलाब गड्डी २०-२५, लिली बंडल (५० काडी) ८-१०, डच गुलाब (२० नग) ४०-५०, अबाेली लड (५० काडी) ५०, जरबेरा २०, कार्नेशन ६०-८०.

मटण, मासळी गणेश पेठ येथील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळीची सुमारे १२ टन, खाडीची मासळी १५० किलो, नदीतील मासळीची  सुमारे १ हजार किलो आवक हाेती. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे १२ टन आवक झाली हाेती.  खोल समुद्रातील मासळीचे दर (प्रतिकिलो) : पापलेट : कापरी : १४००, मोठे : १४००, मध्यम : १००० लहान : ७५०, भिला : ६००, हलवा : ६५०, सुरमई : ७००, मोठे १०००, रावस-लहान : ७००, मोठे  ८०० घोळ : ६५०, करली : ३६०-४००, भिंग : ३६०, पाला : लहान ८००, मोठा १४००, वाम : पिवळी लहान ४००, मोठे ६००, काळी : २८० ओले बोंबील : लहान २००, मोठे ३२०

कोळंबी ः लहान : २८०, मोठी : ४८० जंबो प्रॉन्स : १४००, किंग प्रॉन्स : ९००, लॉबस्टर : १५००, मोरी : लहान २४०, मोठे ४००, मांदेली : १६० राणीमासा : २४०, खेकडे : २८०, चिंबोऱ्या : ४८०. खाडीची मासळी : सौंदाळे : ४००, खापी : ३६०, नगली : लहान ४००,  मोठी ६००-७००, तांबोशी : ३६० पालू : २८०, लेपा : लहान १६० मोठे  २८०, शेवटे : लहान -२५०, माेठे २८०, बांगडा : मोठा २४०-२८० पेडवी : ६०, बेळुंजी : १८०, तिसऱ्या : १८०-२०० खुबे : १६०. तारली : १२०.

नदीची मासळी : रहू : १४०, कतला : १६०, मरळ : लहान ३२० मोठी ४८०, शिवडा : १६० चिलापी : ६०, मांगूर : १००, खवली : १८०, आम्ळी : ८० खेकडे : १६०, वाम : ४००-४८०. मटण : बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०. चिकन : चिकन : १३०, लेगपीस : १६०, जिवंत कोंबडी : १००, बोनलेस : २४०. अंडी : गावरान : शेकडा : ५८०, डझन : ९० प्रति नग : ७.५० इंग्लिश : शेकडा : ४८० डझन : ६६ प्रतिनग : ५.५०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com