agriculture news in marathi,commodity rates in market committee, pune,maharashtra | Agrowon

पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; कोबी, घेवडा वधारला
टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 जून 2018

पुणे  : पूर्वमोसमी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पाण्याअभावी जळून चाललेल्या भाजीपाला पिकांना उभारी मिळाली. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली आहे. रविवारी (ता. १७) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे १८० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली हाेती. आवक कमी असल्याने कोबी, घेवडा या भाज्यांच्या दरात वाढ झाली होती.

पुणे  : पूर्वमोसमी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पाण्याअभावी जळून चाललेल्या भाजीपाला पिकांना उभारी मिळाली. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली आहे. रविवारी (ता. १७) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे १८० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली हाेती. आवक कमी असल्याने कोबी, घेवडा या भाज्यांच्या दरात वाढ झाली होती.

परराज्यांतून हाेणाऱ्या आवकेमध्ये प्रामुख्याने हिमाचल येथून ३ ट्रक मटारची, इंदौरहून ४ टेम्पो गाजराची, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून ४ ते ५ टेम्पो शेवग्याची, आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक येथून १५ ते १६ टेम्पो हिरवी मिरचीची, कर्नाटकातून ५ ते ६ टेम्पो ताेतापुरी कैरीची, गुजरात आणि कर्नाटकातून सुमारे ७ ट्रक काेबीची आवक झाली हाेती.

स्थानिक आवकेमध्ये सातारी आलेची सुमारे १८०० गाेणी, टॉमेटोची सुमारे साडेपाच ते सहा हजार क्रेट, फ्लॅावर आणि काेबीची प्रत्येकी सुमारे सुमारे १४ ते १५ टेम्पो, भुईमूग शेंगांची सुमारे तीनशे पोती, सिमला मिरचीची १० टेम्पो, भेंडीची १० ते १२ टेम्पो आणि गवारची ८ ते १० टेम्पो आवक झाली. गावरान कैरीची २० टेम्पो, तांबडा भोपळ्याची १० ते १२ टेम्पो, गाजराची ३०० पोती इतकी आवक झाली होती. कांद्याची सुमारे ७५ ट्रक, आग्रा, इंदौर, गुजरात आणि स्थानिक बटाट्याची सुमारे ४५ ट्रक आवक झाली. मध्यप्रदेश आणि गुजरात मधून लसणाची सुमारे साडेपाच हजार गोणींची आवक झाली हाेती.

फळभाज्यांचे दर (दहा किलो) : कांदा : ९०-१२०, बटाटा : १३०-१८०, लसूण : १५०-३००, आले सातारी : ५००-५२०, भेंडी : २५०-३००, गवार : गावरान व सुरती ३००-५००, टोमॅटो : १००-१२०, दोडका : ३५०-५००, हिरवी मिरची : ३००-४००, दुधी भोपळा : ५०-१००, चवळी : १५०-२००, काकडी : १३०-१६०, कारली : हिरवी ४००, पांढरी : २५०, पापडी : ३००-३२०, पडवळ : १८०-२२०, फ्लॉवर : १२०-१६०, कोबी : ४०-८०, वांगी : १५०-२५०, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : १४०-१६०, ढोबळी मिरची : ३००-४००, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १००-१२०, शेवगा : ४५०-५००, गाजर : १००-१४०, वालवर : २५०-३००, बीट : ८०-१२०, घेवडा : १०००, कोहळा : १५०-२००, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १६०-१८०, ढेमसे : २००-२५०, मटार : परराज्य : ८००-९००, पावटा : ७००, भुईमूंग शेंग - २५०-३००, तांबडा भोपळा : ४०-८०, सुरण : २६०-२८०, मका कणीस (१०किलो) : ८०-१४०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख जुड्या तर मेथीची अवघी २५ हजार जुडीची आवक झाली. पालेभाज्यांचे दर (शेकडा) ः कोथिंबीर : ८००-१५००, मेथी : ८००-१५००, शेपू : १०००-१५००, कांदापात : १५००-२०००, चाकवत : ५००- ७००, करडई : ५००-७००, पुदिना : ३००-५००, अंबाडी : ८००-१०००, मुळे : ८००-१५००, राजगिरा : ५००-७००, चुका : ८००-१२००, चवळई : ५००-७००, पालक : ५००-७००.

रविवारी (ता.१७) फळबाजारात मोसंबीची सुमारे १५ टन, संत्रीची ५० ते ६० क्रेट, डाळिंबाची ३० ते ३५ टन, पपईची सुमारे ८ ते १० टेम्पोे, लिंबाची सुमारे ५ ते ६ हजार गोणी, चिकूची ४०० गाेणी, पेरुची सुमारे ५० क्रेट, कलिंगडाची १० ते १५ टेम्पो, खरबुजाची १० ते १२ टेम्पाे, तर आंब्याची १५ ते २० टन आवक झाली हाेती.

फळांचे दर : लिंबे (प्रति गोणी) : ५०-१५०, मोसंबी : (३ डझन) : २५०-४५०, (४ डझन ) : ८०-२३०, संत्रा : (३ डझन) ३००-४५०, (४ डझन) : १२०-३००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-८०, गणेश ५-२५, आरक्ता १०-४० कलिंगड : ५-१२, खरबूज : १०-२०, पपई : ५-१५, चिक्कू : (१० किलाे) १००-६००, पेरू (२० किलो) : ७००-८००, सीताफळ : ४०-१६०, कर्नाटक हापूस : २० -३०, लालबाग : १२ -१५, तोतापुरी : १५ - २०, बदाम : १५ - १८, निलम : १५ - २०.

फुलांचे दर (प्रतिकिलाे) ः झेंडू -३०-८०, गुलछडी ५०-८०, कापरी ५०-८०, मोगरा : १००-२५०, आॅस्टर (चार गड्डी) ३०-५०, गुलाबगड्डी (१२ नगाचे दर) १०-२०, गुलछडी काडी १०-४०, डच गुलाब (२० नग) ५०-९०, लिली बंडल (५० काडी) ३-६, जरबेरा १०-३०, कार्नेशन ६०-१२०.

गणेश पेठेतील मासळी बाजारात गुजरात व मुंबईच्या किनाऱ्यावरून मासळीची आवक होत आहे. आवकेत घट होऊन, मागणी वाढल्याने बहुतेक सर्वच मासळीच्या दरात १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली हाेती. मासळीच्या आवकेत गुजरात व आंध्र प्रदेश येथून खोल समुद्रातील सुमारे ४ ते ५ टन, खाडीची ५० ते १०० किलो, नदीची १ टन आणि आंध्र प्रदेशातून रहू, कतला सिलनची १४ टन आवक झाली हाेती.

खोल समुद्रातील मासळी दर (प्रतिकिलो) : पापलेट : कापरी : २४००, मोठे : २०००, मध्यम : १६००-, लहान : ८००-९००, भिला : ७००, हलवा : ११००-१२००, सुरमई : लहान १०००, मध्यम १४००, रावस-लहान : १०००-१२००, घोळ : ८००, करली : ४००, भिंग : ४००, पाला : ११००-१२००, वाम : पिवळी ७००-१०००, काळी : ४८०, ओले बोंबील : २००-२८०.

कोळंबी : लहान : २८०, मोठी : ४८०, जंबोप्रॉन्स : १६००, किंगप्रॉन्स : ९००, लॉबस्टर : १६००, मोरी : २४०-४८०, मांदेली : १६० राणीमासा : २००, खेकडे : २८०, चिंबोऱ्या : ४८०. खाडीची मासळी : सौंदाळे : ४००, खापी : ३२०, नगली : ४००, तांबोशी : ४८०, पालू : २८०, लेपा : ३२०, शेवटे : २८० बांगडा : लहान : २४०, मोठे : ३६० ,पेडवी : १००, बेळुंजी : २००, तिसऱ्या : २०० खुबे : २००, तारली : १४०. नदीची मासळी : रहू : १६०, कतला : १४०, मरळ : ४८०, शिवडा : १८० चिलापी :८०, मांगूर : १२०, खवली : २००, आम्ळी : ८० खेकडे : १६०, वाम : ४८०.

मटण : बोकडाचे : ४६०, बोल्हाईचे : ४६०, खिमा : ४६०, कलेजी : ४८०.
चिकन : चिकन : १५०, लेगपीस : १८० जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०.
अंडी : गावरान : शेकडा : ६५०, डझन : ९०, प्रति नग : ७.५०. इंग्लिश : शेकडा : ४४० डझन : ६० प्रतिनग : ५.

इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; कोबी,...पुणे  : पूर्वमोसमी पावसाने लावलेल्या...
सातत्यपूर्ण तेजीनंतर बाजारात नरमाई शक्यमागील दोन आठवड्यांत ब्रॉयलर्स पक्ष्यांना उच्चांकी...
जळगाव येथे चवळी शेंगा ३५०० रुपये क्विंटलजळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
प्रवीस कृषी रसायनाची सीआयबी रजिस्टर्ड...कोल्हापूर : येथील प्रवीस कृषी रसायन या कंपनीने...
कळमणा बाजारात कांदा, बटाट्याची सर्वाधिक...नागपूर ः येथील कळमणा बाजारात बुधवारी (ता. १३)...
औरंगाबाद येथे कारले १५०० ते २५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
साताऱ्यात ढोबळी मिरची दहा किलोला २०० ते...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
पुण्यात बहुतांश भाजीपाल्यांच्या दरात ३०...पुणे  ः शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर...
थंडाव्यामुळे ब्रॉयलरच्या खपात सुधारणा,...ब्रॉयलर कोंबड्यांची प्रमुख बाजारपेठ असलेल्या...
परभणी शेवगा ३५०० ते ४५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील जुना मोंढा भागातील फळे-...
सांगलीत हळद ६००० ते ११००० रुपये क्विंटल सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २९)...
वर्षातील उच्चांकी पातळीवरून ब्रॉयलर्स...गेल्या आठवड्यात उच्चांकी भावपातळीवरून ब्रॉयलर्सचा...
पुण्यात कारली, फ्लॉवर, सिमला मिरचीचे दर...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात कांदा १०० ते ९०० रुपये...नाशिकला ३०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल नाशिक...
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले...नागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर...
नगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये...नगर : नगर बाजार समितीत गव्हाची आवक बऱ्यापैकी होत...
नाशिकला आंबा, खरबूज, कलिंगड तेजीतनाशिक : वाढत्या उन्हाबरोबरच नाशिक बाजार समितीत...