सांगलीत गूळ ३५५० ते ४२६० रुपये क्विंटल

गुळ दर
गुळ दर
सांगली : येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी अधिक प्रमाणात होत आहे. पुढील आठवड्यात गुळाची आवक वाढण्याची शक्‍यता आहे. मंगळवारी (ता. २१) गुळाची १४८९ क्विंटल आवक झाली. गुळाला ३५५० ते ४२६० रुपये; तर सरासरी ३९०५ रुपये क्विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
बाजार समितीत सोयाबीनची १६ क्विंटल आवक झाली. सोयाबीनला ३०५० ते ३१०० रुपये क्विंटल असा दर होता. हरभऱ्याची २० क्विंटल आवक झाली होती. हरभऱ्यास ४४०० ते ४५०० रुपये क्विंटल दर मिळाला. तांदळाची ३९५ क्विंटल आवक झाली. तांदळाला २००० ते ६५०० रुपये क्विंटल दर मिळाला.
विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची १११४ क्विंटल आवक झाली. कांद्याला ५०० ते ४५०० रुपये क्विंटल दर होता. बटाट्याची ४६० क्विंटल आवक झाली. बटाट्याला ६०० ते ९०० रुपये क्विंटल दर होता. मोसंबीची ११७० डझन आवक झाली. त्यास २०० ते ४०० रुपये दहाकिलो असा दर मिळाला. संत्र्याची ५११० डझन आवक झाली. संत्र्यास २०० ते ७०० रुपये दहाकिलो दर होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com