साताऱ्यात काळा घेवडा २५० ते ३५० रुपये दहा किलो

काळा घेवडा
काळा घेवडा
सातारा  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. १६) काळा घेवडा, हिरवी मिरचीचे दर तेजीत होते. वांगी, फ्लॉवर, मेथी, कोथिंबिरीच्या आवकेत वाढ झाली. काळा घेवड्याची १६ क्विंटल आवक झाली. काळा घेवड्यास २५० ते ३५० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. गुरुवारच्या (ता. ११) तुलनेत काळा घेवड्याच्या दरात दहा किलोमागे ५० रुपयांनी वाढ झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीत हिरवी मिरचीची सात क्विंटल आवक झाली. मिरचीस २५० ते ३०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. मिरचीच्या दरात दहा किलो मागे ५० रुपयांनी वाढ झाली. पावट्याची १३ क्विंटल आवक झाली. पावट्यास ५०० ते ६०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. शेवग्याची सहा क्विंटल आवक झाली. शेवग्यास ३०० ते ४०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. गवारीची दोन क्विंटल आवक झाली असून, गवारीस ४०० ते ५०० रुपये प्रतिदहा किलो दर मिळाला.

वाल घेवड्याची चार क्विंटल आवक झाली. वाल घेवड्यास ३०० ते ३५० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. वाटाण्याची सात क्विंटल आवक झाली. वाटाण्यास २५० ते ३०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. भेंडीची १४ क्विंटल आवक झाली. भेंडीस २५० ते ३०० रुपये प्रतिदहा किलो दर मिळाला. दोडक्‍याची पाच क्विंटल आवक झाली.

दोडक्‍यास २५० ते ३०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. वांग्याची २५ क्विंटल आवक झाली. वांग्यास १५० ते २०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. फ्लॉवरची ५० क्विंटल आवक झाली. फ्लॉवरला ६० ते ८० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला.

पालेभाज्यात मेथीची ३००० जुड्या आवक झाली. मेथीस शेकडा ३०० ते ४०० रुपये असा दर मिळाला. कोथिंबिरीची ३५०० जुड्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा ५०० ते ६०० रुपये असा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com