परभणीत फ्लॉवर ३०० ते ७०० रुपये क्विंटल

फ्लाॅवर
फ्लाॅवर
परभणी : येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये बुधवारी (ता. २८) फ्लाॅवरची ३५ क्विंटल आवक झाली. फ्लॉवरला ३०० ते ७०० रुपये क्विंटल दर मिळाल्याची माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.
 
बाजार समितीत पालेभाज्यांमध्ये पालकाची २५ क्विंटल आवक झाली. पालकाला ३०० ते ५०० रुपये क्विंटल दर मिळाले. चुक्याची १० क्विंटल आवक झाली. त्यास ५०० ते १००० रुपये क्विंटल असे दर मिळाले. मेथीच्या ३० हजार जुड्यांची आवक झाली. मेथीस प्रतिशेकडा १०० ते २०० रुपये दर मिळाले. शेपूची २० क्विंटल आवक झाली. शेपूला ६०० ते १२०० रुपये क्विंटल असे दर मिळाले.कोथिंबिरीची ८० क्विंटल आवक झाली. कोथिंबीरीला ५०० ते १५०० रुपये क्विंटल दर मिळाले.
 
वांग्याची ४० क्विंटल आवक झाली. वांग्याला ४०० ते ८०० रुपये क्विंटल असे दर मिळाले. टोमॅटोची ७०० क्विंटल आवक झाली. त्यास २०० ते ४०० रुपये क्विंटल असे दर मिळाले. हिरव्या मिरचीची ४० क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला २५०० ते ३५०० रुपये क्विंटल असे दर मिळाले. ढोबळी मिरचीची १० क्विंटल आवक झाली. ढोबळी मिरचीला २००० ते २५०० रुपये क्विंटल असे दर मिळाले.
 
मार्केटमध्ये भेंडीची ८ क्विंटल आवक झाली. भेंडीला २५०० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. कोबीची ४० क्विंटल आवक झाली. कोबीला ३०० ते ६०० रुपये क्विंटल दर मिळाले. दोडक्याची ७ क्विंटल आवक झाली. दोडक्याला २५०० ते ३००० रुपये क्विंटल असे दर मिळाले. कारल्याची १० क्विंटल आवक झाली. कारल्यास १५०० ते २५०० रुपये क्विंटल असे दर मिळाले. काकडीची ४० क्विंटल आवक झाली. काकडीला ४०० ते १००० रुपये क्विंटल दर मिळाले.
 
शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची १० क्विंटल आवक होती. शेवग्याला १००० ते २५०० रुपये क्विंटल असे दर मिळाले. गाजराला ३०० ते ६०० रुपये क्विंटल असे दर मिळाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com