agriculture news in marathi,commodity rates in market committee,pune, maharashtra | Agrowon

पुण्यात कांदा, लसूण, फ्लॉवरच्या दरात वाढ
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 एप्रिल 2019

पुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २१) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवकेत वाढ झाली होती. मात्र सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाल्याने आवक सरासरीपेक्षा मंदावली आहे. दरम्यान कांदा, लसूण, फ्लॉवर, सिमला मिरची, गाजर, तांबडा भोपळा यांच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली होती तर पालेभाज्यांचे वाढलेले दर स्थिर होते.  

पुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २१) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवकेत वाढ झाली होती. मात्र सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाल्याने आवक सरासरीपेक्षा मंदावली आहे. दरम्यान कांदा, लसूण, फ्लॉवर, सिमला मिरची, गाजर, तांबडा भोपळा यांच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली होती तर पालेभाज्यांचे वाढलेले दर स्थिर होते.  

विविध भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरचीची, हिमाचल प्रदेशातून सुमारे ४ ट्रक मटारची, कर्नाटक आणि गुजरात येथून ३ ट्रक कोबीची, कर्नाटकमधून तोतापुरी कैरीची सुमारे ५ टेम्पो, बंगळूर येथून आल्याची १ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी आवक झाली होती.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आल्याची सुमारे १ हजार गोणी, टोमॅटोची सुमारे ५ हजार क्रेट, कोबी आणि फ्लॉवरची प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, ढोबळी मिरचीची ८ टेम्पो, तांबड्या भोपळ्याची १० टेम्पो, काकडीची १०, वांगीची १० ते १२ टेम्पो, कांद्याची सुमारे ७० ट्रक तर स्थानिकसह आग्रा, इंदूर येथून बटाट्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली होती.

फळभाज्यांचे दर (प्रति दहा किलो) ः कांदा - ६०-९०, बटाटा- १००-१५०, लसूण - ७००-९००, आले : सातारी ५५०-६५०, भेंडी : ३००-४००, गवार : ३००-५००, टोमॅटो - ८०-१२०, दोडका : ३००-४००, हिरवी मिरची : ३५०-५००, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी : २००-२५०, काकडी : ८०-१००, कारली : हिरवी ३५०-४००, पांढरी २००-२५०, पापडी : ४०० -४५०, पडवळ :३००-३५०, फ्लॉवर : १४०-१६०, कोबी : ८०-१२०, वांगी : १०० -२००, डिंगरी : २०० -२५०, नवलकोल :१०० -१२०, ढोबळी मिरची : ४००-४५०, तोंडली : कळी ३००- ३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : १८०-२००, गाजर : १४०- १६०, वालवर : ३५०-४००, बीट : ८०-१००, घेवडा : ६००-६५०, कोहळा : १५० -२००, आर्वी : ३००- ३५०, घोसावळे :२०० -२५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग : ४०० -४५०, पावटा : ५०० -५५०, मटार : ४५०-४६०, तांबडा भोपळा १५०-२००, चिंच अखंड ३०० -३५०, सुरण : २५०-२६०, मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
 

पालेभाज्या
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे सव्वा लाख, तर मेथीची सुमारे ५० हजार जुड्या आवक झाली होती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) :  कोथिंबीर : १३०० -१६००, मेथी : ६००-१०००, शेपू : ७००-१०००, कांदापात : ८०० -१०००, चाकवत : ५०० -६००, करडई : ५०० -६००, 
पुदिना : १५० -२००, अंबाडी : ७००-८००, मुळे : १०००-१२००, राजगिरा : ५०० -७००, चुका : ८००-१०००, चवळई : ६०० -८००, पालक : ६०० -८००.
 

फळबाजार
रविवारी (ता. २१) मोसंबीची सुमारे ५० टन, संत्रीची २० टन, डाळिंबाची २०० टन, पपईची १० टेम्पो, लिंबाची सुमारे दोन हजार गोणी, चिकूची २ हजार डाग, कलिंगडाची ३० टेम्पो, खरबूजाची २५ टेम्पो, आणि द्राक्षांची ३ टन आवक झाली होती. कोकणातून हापूस आंब्याची सुमारे पाच हजार पेटी आवक झाली होती. कर्नाटकातून विविध जातींच्या आंब्याची सुमारे १५ हजार पेटी, करंडीची आवक झाली होती.

फळांचे भाव : लिंबे (प्रति गोणी) : ६००-११००, मोसंबी : (३ डझन) : १५०-३५०, (४ डझन ) : ६०-१५०, संत्रा : (३ डझन) : १८०-४५०, (४ डझन) : ७०-२००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-६०, गणेश ५-२०, आरक्ता ५-४०. कलिंगड : ५-१२, खरबूज : १०-२०, पपई : ५-२०, चिकू : १००-८५०, द्राक्षे : सुपर सोनाका (१५ किलो) १०००-१३००, माणिकचमन (१५ किलो) ७००-९००. आंबा (कर्नाटक) : बदाम (१ किलो) ३०-४०, लालबाग २५-४५, हापूस (४-५ डझन) ८००-१६००, पायरी (५ डझन) ५००-८००. कोकण हापूस (४-८ डझन) तयार - १५००-३५००, (५ ते १० डझन) तयार २००० ते ४५००.

फूलबाजार
उन्हाळ्यामुळे विविध फुलांचे उत्पादन घटले असून, लग्न हंगाम सुरू असल्याने विविध फुलांना मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे. शोभिवंत फुलांना विशेष मागणी असल्याने त्यांच्या दरात उल्लेखनीय वाढ झाली आहे.

फुलांचे दर (प्रति किलो) : झेंडू : ३०-६०, गुलछडी : १००-१२०, बिजली : ४०-८०, कापरी : २०-६०, मोगरा : २००-३००, ॲस्टर : १२-१६, (गड्ड्यांचे भाव) गुलाब गड्डी : २०-४०, गुलछडी काडी : ४०-६०, डच गुलाब (२० नग) :६०-१२०, लिली बंडल : ६-१०, जरबेरा : ४०-७०, कार्नेशियन : १००-१५०.
 

इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या...फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील...
सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून...नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर...
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव...नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या...
चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस...बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली...
गंगापुरात बनावट खतसाठा जप्तऔरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत...
सहकार आयुक्तालयातील नियुक्त्यांचे घोळ...पुणे  : दुष्काळ, कर्जमाफी आणि घसरलेले...
संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील...अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या...
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
झाडावर नाही, काळजावर घाव पडतात नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली...
सातारा जिल्ह्यात २५४ टँकरद्वारे...सातारा  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची...
नगरमधील शेतकऱ्यांना साडेचाळीस कोटींचे...नगर  ः सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल २००...
सांगलीत शेतकऱ्यांचा जनावरांसह मोर्चासांगली  : जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता...
वऱ्हाडात बाजी कुणाची?अकोला ः  लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही...
पुणे विभागात ‘जलयुक्त’ची आठ हजारांवर...पुणे : भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने...
नेता निवडीचा अधिकार राहुल गांधींनामुंबई  ः काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ नेता...
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...