बोगस मिश्रखत विक्री प्रकरणी कंपनीमालक, विक्रेत्याला सश्रम कारावास

बोगस मिश्रखत विक्री प्रकरणी कंपनीमालक, विक्रेत्याला सश्रम कारावास
बोगस मिश्रखत विक्री प्रकरणी कंपनीमालक, विक्रेत्याला सश्रम कारावास

पुणे : शेतकऱ्यांना बोगस मिश्रखताचा पुरवठा केल्याबद्दल उत्पादकासह विक्रेत्याला न्यायालयाने दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. यामुळे राज्यातील मिश्रखत उद्योगात खळबळ उडाली आहे.  कृषी आयुक्तालयातील गुण नियंत्रण विभागाच्या खत कक्षाचे उपसंचालक तानाजी कोलते यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. "राज्यात सध्या मिश्रखतांच्या चार ग्रेड उपलब्ध असून, पुरवठा वेळेवर होतो आहे. न्यायालयाने दिलेला निकाल हा २००७ मधील एका प्रकरणाचा आहे, अशी माहिती आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.  ‘‘उत्तर महाराष्ट्रात १८:१८:१० ग्रेडच्या अप्रमाणित मिश्रखतांचा पुरवठा होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाल्यानंतर नमुने घेण्यात आले होते. त्यात सटाणा भागात सचिन सुभाष बंब यांच्या दुकानात धरतीधन फर्टिलायझर्स कंपनीचे खत अप्रमाणित आढळले. या प्रकरणात खत विक्रेता आणि उत्पादक दोषी असल्याचा कृषी विभागाचा दावा न्यायालयाने मान्य केला’’, असे सूत्रांनी स्पष्ट केले.  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. जी. तापडियांनी आपल्या निकालपत्रात नमुद केले, की खत नियंत्रण आदेश १९८५ मधील कलम तीन व सातनुसार तसेच जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या कलम दहा नुसार कंपनीचे ज्ञानेश्वर दिगंबर जगदाळे यांना दोन वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात येत आहे. विक्रेता सचिन सुभाष बंब यांनादेखील दोन्ही कायद्यांत दोषी ठरवून न्यायालयाने दोन वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली  आहे.  ‘‘राज्यातील शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची खते उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाचा सतत पाठपुरावा सुरू होता. न्यायालयाच्या या निकालामुळे शेतकऱ्यांची फसवूणक करणऱ्या यंत्रणेला चपराक बसेल’’, अशी प्रतिक्रिया कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com