agriculture news in marathi,Compensation to cotton growers | Agrowon

कापूस उत्पादकांना मिळणार नुकसान भरपाई
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 जून 2018

धुळे : जिल्ह्यातील बेटावद महसूल मंडळाला गुलाबी बोंड अळीसंबंधी नुकसानग्रस्त कापूस उत्पादकांसाठी सर्वाधिक एक कोटी 23 लाख रुपये भरपाई मिळाली आहे. जिल्ह्यात एकूण एक कोटी 36 लाख रुपये निधी या भरपाईसाठी मिळाला असून, फक्त 13 लाख रुपये भरपाई इतर महसूल मंडळांना मिळणार आहे. निधी प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे, परंतु त्याचे वितरण अजूनही सुरू झालेले नाही. शेतकरी भरपाई किंवा मदतनिधी केव्हा मिळेल, याची प्रतीक्षा करीत आहेत.

धुळे : जिल्ह्यातील बेटावद महसूल मंडळाला गुलाबी बोंड अळीसंबंधी नुकसानग्रस्त कापूस उत्पादकांसाठी सर्वाधिक एक कोटी 23 लाख रुपये भरपाई मिळाली आहे. जिल्ह्यात एकूण एक कोटी 36 लाख रुपये निधी या भरपाईसाठी मिळाला असून, फक्त 13 लाख रुपये भरपाई इतर महसूल मंडळांना मिळणार आहे. निधी प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे, परंतु त्याचे वितरण अजूनही सुरू झालेले नाही. शेतकरी भरपाई किंवा मदतनिधी केव्हा मिळेल, याची प्रतीक्षा करीत आहेत.

बेटावदला पीक कापणी प्रयोगांबाबत जागरूकता :
बेटावद महसूल मंडळ हे शिंदखेडा तालुक्‍यात आहे. या तालुक्‍यात मागील पाच वर्षांत कापूस इतर पिकांचे पीक कापणी प्रयोग महसूल व इतर यंत्रणांच्या मदतीने झाले, त्यात उत्पादनाबाबतची वास्तविकता दाखविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. विशेषतः पढावद (जि. धुळे) येथील जीवनधारा शेतकरी उत्पादक कंपनीने या पीक कापणी प्रयोगांमध्ये वास्तव कसे समाविष्ट होईल, यासाठी प्रशासनाकडे रेटा लावला. परिणामी, मागील पाच वर्षांचे सरासरी उत्पादन, उत्पादकता यासंबंधी या महसूल मंडळात सरासरी दिसत आहे. यामुळे विमा वितरण करताना सरासरी उत्पादन व उत्पादकता याची माहिती महसूल विभागाने दिली, त्यानुसार विम्याची रक्कमही या मंडळास मिळाली आहे.

कमी उंबरठा उत्पादन किंवा अतिशय कमी उत्पादन दाखविण्याचा अट्टाहास या भागातील शेतकऱ्यांनी केलाच नाही. त्यामुळे आता भरपाईची मोठी रक्कम या मंडळाला मिळणार असल्याचा दावा जीवनधारा शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केला.

बोंड अळीच्या भरपाईबाबतची मंडळनिहाय जाहीर रक्कम :

(रक्कम किंवा निधी रुपयात)

आर्वी २३०८२८
बोरकुंड २१०३४४
धुळे ग्रामीण ४१६०९
धुळे शहर १८२३
फागणे एक ५२३२६
फागणे दोन १७८८१०
कुसुंबा २३१५७
लामकानी ६६७८६
मुकटी ५१९७५
नगाव ४४२३०
नेर १७३३
शिरूड १९९०१८
सोनगीर १६८४२१
बेटावद १२३०७०५१

 

इतर बातम्या
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
मेहकर तालुक्यात पाझर तलावात बुडून...बुलडाणा : गणेश विसर्जनासाठी गेलेल्या चौघांपैकी...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
शासनाच्या तीन खरेदी केंद्रांद्वारे...जळगाव : उडीद, मूग, सोयाबीनचे बाजारातील दर...
कादवाच्या विस्तारीकरणावर भर देणार : शेटेचिंचखेड, जि. नाशिक : ‘‘शासनाने इथेनॉल...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
‘आरटीजीएस'द्वारे ग्रामपंचायत...सोलापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सहा...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...