नगर जिल्ह्यातील ७८ गावांना दूषित पाणी

दूषित पाणी
दूषित पाणी
नगर  : जिल्ह्यातील १५५८ पैकी ९३ जलस्त्रोतांमधील पाणी दूषित असून ७८ गावांतील लोक दूषित पाणी पीत असल्याचे आरोग्य विभागाच्या मागील महिन्यातील तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागात दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत असताना ग्रामपंचायतींचा निष्काळजीपणा मात्र स्पष्ट होत आहे. 
 
आरोग्य विभागातर्फे दर महिन्याला पिण्याचे पाणी असलेल्या स्रोतांचा तपासणी अहवाल केला जातो. मागील महिन्यात १५५८ स्त्रोतांची तपासणी केली. जिल्ह्यातील गावांना पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या जलस्रोतांचे सर्वेक्षण जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेतील वैज्ञानिक अधिकाऱ्यांकडून करण्यात येते.
 
हातपंप, विहीर, कूपनलिका, तलाव आदींमधील पाणीनमुने तपासणीसाठी घेतले जातात. जिल्हा परिषदेच्या आरोग्य प्रयोगशाळेत त्यांची तपासणी केली जाते. दूषित पाणीस्रोत आढळलेल्या ग्रामपंचायतींना उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या जातात. त्यासाठी ग्रामपंचायतींना टीएलसी पावडर पुरविण्यात येते. आरोग्य विभाग प्रत्येक महिन्याला जलस्त्रोतांच्या पाणीनमुन्यांची तपासणी करतो; मात्र ग्रामपंचायती त्याची दखल घेतल्याचे दिसत नाही. पाणीनमुने दूषित आढळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. १५५८ स्त्रोतांपैकी ९३ स्त्रोतांमधील पाणी दूषित आहेत. 
 
दूषित पाणी असलेली गावे : नगर : खारेकर्जुने, राळेगण, चास. अकोले : पोपळेवाडी, केळीरुमनवाडी, लिंगदेव, भोलेवाडी, चिंचोडी  धुमाळवाडी, शेलद, विठा, कोहणे, देवठाण, शेंडी. कर्जत ः नामगाव डाकू. 
नेवासे : चांदा, नेवासा खुर्द, चिंचबन, तापमसवाडी. 
पारनेर : गांजीभोयरे, चिंचोली, पिंप्री जलसेन, करंजी, वेसदरे, विरोली, किन्ही, अक्‍कलवाडी, पळसपूर, काटाळवेढे, डोंगरवाडी. पाथर्डी : खांडगाव, भिलवडे, भुतेटाकळी, एकनाथवाडी.
 
राहाता : कोऱ्हाळे, अस्तगाव. राहुरी : मल्हारवाडी, मोमीन आखाडा, घोरपडवाडी, कुरणवाडी, टाकळीमिया, मोरवाडी, मुसळगाव, ताहराबाद, बेलकरवाडी, गाडकवाडी, काठेवाडी, चिखलठाण, मुसळवाडी, शिलेगाव. शेवगाव : हातगाव, बालमटाकळी, पानमळा, वाघोली, हिंगणगाव, एरंडगाव. 
श्रीगोंदे : मढेवडगाव. श्रीरामपूर : माळवडगाव.
संगमनेर ः भोजदरी, आदर्शनगर, आचितनगर, निमोण, मालपाणीनगर, कौठे मलकापूर, नि. भोजापूर, माळेगाव पठार, आंबीदुमाला, पानोडी, दाढ खु., कोहडी. कोपरगाव ः धोंडेवाडी, कोळपेवाडी. जामखेड ः जवळा, मतेवाडी, मंजेवाडी, सारोळा, मोहा, पाडळी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com