agriculture news in Marathi,Counting of 543 villages in Nashik district by drones | Agrowon

नाशिक जिल्ह्यातील ५४३ गावांची ड्रोनद्वारे मोजणी
तुषार देवरे
शनिवार, 18 मे 2019

नाशिक ः गावठाण निश्‍चितीसाठी गावांमध्ये ग्रामसभा घेऊन जुने व नवे गावठाण कृती आराखडा करण्यासाठी ड्रोनद्वारे मोजणी लवकरच जिल्ह्यात होणार आहे. जिल्ह्यातील ६५० गावांपैकी १५० गावांचा गावठाण सर्व्हे यापूर्वी झाला आहे. उर्वरित वाडे, वस्ती, पाडे अशा ५४३ गावांच्या गावठाण भूूूमापनाचा सर्व्हे ड्रोनद्वारे पुढील दोन महिन्यांपासून सुरू होणार आहे.

नाशिक ः गावठाण निश्‍चितीसाठी गावांमध्ये ग्रामसभा घेऊन जुने व नवे गावठाण कृती आराखडा करण्यासाठी ड्रोनद्वारे मोजणी लवकरच जिल्ह्यात होणार आहे. जिल्ह्यातील ६५० गावांपैकी १५० गावांचा गावठाण सर्व्हे यापूर्वी झाला आहे. उर्वरित वाडे, वस्ती, पाडे अशा ५४३ गावांच्या गावठाण भूूूमापनाचा सर्व्हे ड्रोनद्वारे पुढील दोन महिन्यांपासून सुरू होणार आहे.

त्यात प्रायोगिक गावांचा पहिला भाग पूर्ण करण्यासाठी पुढील महिन्यात धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर तालुक्‍यांतील दहा गावांचे ड्रोनने भूमापन करण्यात येणार आहे. त्यानंतर कामकाजाला गती देऊन इतर गावांचा सर्व्हे होईल. तसे नियोजन जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयातून झाले आहे.

लोकसभेच्या निवडणुका संपताच ड्रोनद्वारे गावठाण भूमापन करावयाचा आराखडा जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख यांनी निश्‍चित केला आहे. ग्रामीण भागातील मिळकतींचा सिटी सर्व्हेअंतर्गत जुने गावठाण, नवीन गावठाण यांचे ड्रोनद्वारे भूमापन होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील मिळकतींचा नकाशा तयार होऊन सीमा निश्‍चित होईल व निवडणुकांमुळे संबंधित गावांच्या ग्रामसभा व मिळकतीचे नेमके क्षेत्र माहीत होणार आहे. याबाबत भूमी व मोजणी प्रत्यक्षात करण्यासाठी अभिलेख विभागाला शासनाचे पत्र प्राप्त झाले आहे. यामुळेगावातील जागेसंदर्भातील वाद संपुष्टात येणार आहेत.

अतिक्रमणाला पायबंद बसेल
गावठाण भूमापनासाठी अधिसूचना मंजूर करणे, ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांना माहिती देणे. गावठाण निश्‍चित करण्यासाठी लगतच्या सर्व्हे नंबरची मोजणी काम करून गावठाणाची हद्द निश्‍चित करणे. ग्रामसचिवांकडून नमुना आठचे आकारणीचे अद्ययावत तक्ते, एक्‍सेल फॉरमॅटमध्ये गावाचे सेन्सेस कोडनुसार मिळवणे, त्यानंतर गावठाण भूमापनासाठी हैदराबादच्या सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने ड्रोनद्वारे गावांचे भूमापन करणे यांचा समावेश आहे. ग्रामपंचायतीला करआकारणी, बांधकाम परवानगी, पूर्ण करण्यासाठी प्रत्येक तालुक्‍यातील १० अतिक्रमण निर्मूलनासाठी अभिलेख व नकाशा तयार करण्यास मदत होणार आहे. ड्रोनद्वारे गावठाण भूमापन मोजणी करण्यास मदत होईल.

दृष्टीक्षेपात ड्रोन मोजणी
तीन वर्षांत राज्यातील ४० हजार गावे पूर्ण करण्याचे लक्ष्य  पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्‍यातील २५ अथवा दहा गावे  पहिल्यांदा तीन महिन्यांत सर्व गावची हद्द निश्‍चिती होणार  मनुष्यबळ व इतर भौतिक सुविधा ग्रामपंचायत पुरवणार जुलै ऑगस्टमध्ये प्रत्यक्ष ड्रोनद्वारे मिळकतीची मोजणी ''सर्व्हे ऑफ इंडिया'' ही संस्था करणार.

प्रतिक्रिया
भूमीअभिलेख व ग्रामविकास विभागाच्या सहकार्याने हे काम होणार आहे. गावची हद्द निश्‍चित होऊन सुसूत्रता येणार आहे. प्रत्यक्ष ड्रोनद्वारे मिळकतींची मोजणी पारदर्शक होईल. येत्या दोन महिन्यांत काम सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्‍यांतील प्रत्येकी दहा गावे पथदर्शी प्रकल्पातर्गंत घेतली आहेत.
- प्रशांत बिलोलीकर, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, धुळे.

या योजनेमुळे होणारे फायदे 

 • राज्यातील सर्व महसुली गावांच्या गावठाणाचे  शासकीय मिळकतींचे संरक्षण होणार  
 • मिळकतींचा नकाशा व सीमानिश्‍चिती
 • मिळकतींच्या नेमक्‍या क्षेत्राची माहिती
 • मालकी हक्काची अभिलेख मिळकतपत्रिका  
 • ग्रामस्थांच्या नागरी हक्कांचे संवर्धन
 • गावातील रस्त्यांचे अचूक नकाशे
 • नाल्यांच्या सीमा निश्‍चित होणार
 • अतिक्रमणास चाप बसणार
 • मिळकतींमुळे बाजारपेठेत तरलता येणार
 • गावाची आर्थिक पत उंचावेल.
 • मिळकत पत्रिकेमुळे घरावर कर्ज घेणे सुलभ होईल.

इतर ताज्या घडामोडी
कृषी विभाग म्हणते, पॉलिहाउस, शेडनेट...जळगाव ः खानदेशात १ ते ११ जून यादरम्यान झालेल्या...
केळी पीकविमाधारकांना परताव्यांची...जळगाव  ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत...
कांदा निर्यात, प्रक्रियेवर भर गरजेचा ः...राजगुरुनगर, जि. पुणे : कांदा बाजारभावातील अनिश्‍...
सात महिन्यांपूर्वी विकलेल्या मुगाचे...अकोला ः नाफेडने खरेदी केलेल्या मुगाचे पैसे सात...
महावितरण’द्वारे देखभाल, दुरुस्तीची ९०३३...‘सातारा : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व...
रत्नागिरीत खतनिर्मिती कारखान्यावर छापारत्नागिरी : येथील एमआयडीसी परिसरात मच्छीच्या...
आषाढी पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभाग...पुणे : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर...
गोंदिया जिल्ह्यात २ लाख हेक्‍टरवर...गोंदिया ः राइससिटी असा लौकिक असलेल्या गोंदिया...
औरंगाबाद जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती औरंगाबाद : जिल्ह्यातील ७७८ गाव व २७२...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कापूस...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २०१८-...
जतला कर्नाटकातून पाणी मिळणे धूसरसांगली : कर्नाटकातून कृष्णेचे पाणी जत तालुक्याला...
आषाढी वारीत ३५ हजार विद्यार्थी करणार...सोलापूर : आषाढी वारीत पाच विद्यापीठांतील ३५ हजार...
कात्रजकडून गायीच्या दूध खरेदीदरात वाढपुणे  : दुष्काळी स्थितीत दूध उत्पादक...
विधीमंडळ अधिवेशन ः सलग तिसऱ्या दिवशीही...मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही...
हायब्रीड बियाणे किमतीवर सरकारी नियंत्रण...पुणे  : महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती...
सरकारला शेतकऱ्यांचे काहीच पडलेले नाही ः...मुंबई  : ''किडनी घ्या; पण बियाणे द्या...
‘सर्जा-राजा’ला माउलींच्या रथाचा मानमाळीनगर, जि. सोलापूर  : संत ज्ञानेश्‍वर...
पूर्णवेळ संचालकानेच लावले  `केम`...अमरावती  ः कृषी समृद्धी समन्वयित प्रकल्पातील...
तत्कालीन प्रकल्प अधिकारी ‘केम’...मुंबई : विदर्भातील सहा जिल्ह्यांतील कृषी...
कृषी सल्ला : पानवेल, गुलाब, ऊस, मका,...हवामान ः पुढील पाचही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील...