agriculture news in marathi,crop damage by wild animals,satara, maharashtra | Agrowon

तारळे परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ; पिकांचे नुकसान
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

शेतीसाठी लाखो रुपयांचे कर्ज काढले आहे. मात्र वन्यप्राण्यांमुळे त्यातही रान डुकारांमुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. त्याचा परिणाम अार्थिक उत्पन्नावर होतो. वन विभागाने याची दखल घेऊन कारवाई करावी.
- बंडा पाटील, नुकसानग्रस्त शेतकरी.

तारळे, जि. सातारा  ः तारळेसह परिसरात डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतांना रानडुकरांनी लक्ष्य केले असून ते पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, पीक नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तारळे विभागात तारळी नदीमुळे बागायत क्षेत्रात वाढ होत आहे. तारळी नदीच्या दोन्ही काठांवरील शेतकऱ्यांचे बागायत पिके घेण्याचे प्रमाण वाढले आहे. यात प्रामुख्याने आले, ऊस, तसेच तरकारी पिकांचा समावेश आहे. या सर्वांमध्ये उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात असून, ऊस क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

येथील शेतकऱ्यांनी या पिकांसाठी तारळी नदीवरून खासगी पाणी योजना राबविल्या आहेत. त्यासाठी लाखो रुपयांची कर्जे काढली आहेत. मात्र वन्यप्राणी पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे.

नुकतेच जंगलवाडी डोंगराच्या पायथ्याला असलेल्या शेतातील ऊस रानडुकरांच्या कळपाने आडवा केल्याचे समोर आले आहे. परिसरातील शेतकऱ्यांचे सुमारे एक एकरावरील उसाचे नुकसान झाले आहे. वन विभागही याकडे फारसे गांभीर्याने पाहत नाही. नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा करतात, त्यास नुकसानभरपाईही मिळते; मात्र नुकसानीच्या तुलनेत ती तुटपुंजी असते. त्यामुळे याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
राज्यात भेंडी ५०० ते ३००० रुपये...सांगलीत दहा किलोस २५० ते ३०० रुपये  सांगली...
राज्याचा पुरोगामित्वाचा वारसा जपूया :...मुंबई: शेती, पाणी, गुंतवणूक, गृहनिर्माण अशा विविध...
विदर्भात पावसाचे जोरदार कमबॅकनागपूर ः गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या...
शिराळ्यात नागप्रतिमेची पूजाशिराळा, जि. सांगली ः  अनेक वर्षे जिवंत...
अकोल्यात पावसाचे आगमनअकोला : या भागात गेल्या २० पेक्षा अधिक...
एकात्मिक कीड नियंत्रणात फेरोमोन...कामगंध सापळ्यांचा वापर केल्यास कमी खर्चात कीड...
उत्पादनवाढीसाठी एअरोसोल्सद्वारे...पृथ्वीच्या वातावरणामध्ये कृत्रिमरीत्या सल्फेट...
राजकीय सभ्यता व सुसंस्कृतपणा जपणारा एक...पुणे : राजकिय विरोध कितीही असला तरी राजकारणातील...
अटलजी : एका उत्तुंग नेतृत्वाचा अस्तभारताचे माजी पंतप्रधान, देशाचे लोकप्रिय नेते...
देशाने महान पुत्र गमावला : राहुल गांधी नवी दिल्ली : ''आज भारताने महान पुत्र गमावला...
वाजपेयींच्या निधनाने एका युगाचा अंत :...नवी दिल्ली : ''अटलजींच्या निधनाने एका युगाचा...
अजातशत्रू, मुरब्बी राजकारणी : अटल...शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे,...
...या आजारांनी वाजपेयींना ग्रासले होतेनवी दिल्लीः माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...
वाजपेयींच्या जीवनाशी निगडीत दहा प्रमुख...नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान, ...
सोलापूरात कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वीसोलापूर - सोलापुरात मागील चार दिवसांपासून...
नांदेड: माहूर मंडळात मुसळधारमाहूर, जि. नांदेड : गेल्या अनेक दिवसापासून...
औरंगाबादेत श्रावणाची पहिली सरऔरंगाबाद : गेल्या वीस पंचवीस वडीवसंपासून पावसाने...
एक महिन्याच्या विश्रांतीनंतर लातूर...लातूर : गेल्या एक महिन्यापासून गायब झालेल्या...
पोपट पाळल्यास तुरुंगवासमुंबई - घरात पोपट पाळण्याची हौस महागातही पडू...
मराठवाड्यात पावसाची रिपरिप; पिकांना...औरंगाबाद : पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यातील...