agriculture news in marathi,crop damage by wild animals,varhad, maharashtra | Agrowon

वऱ्हाडात हंगामाच्या सुरवातीपासूनच वन्यप्राण्यांचा त्रास
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 जुलै 2018

परिसरातील बऱ्याच भागात माॅन्सूनपूर्व कपाशीची लागवड झाली आहे. परंतु हरणे रोपांची पूर्ण पाने खातात आणि ते लहान झाडाची पाने खाल्ली तर पूर्ण झाड मरून जाते. त्यामुळे तेथे पुन्हा बियाणे लावावे लागत आहे आणि केळीच्या लहान रोपांची रानडुकरे नासाडी करीत आहेत. याबाबत संबंधित विभागाने पंचनामे करून दखल घ्यावी आणि नुकसानभरपाई द्यावी.

- विशाल भालतिलक, बोर्डी, ता.अकोट, जि. अकोला.

अकोला : जंगलाचे क्षेत्र सातत्याने घटत चालल्याने वन्यप्राणी मानवी वस्त्यांचा अाश्रय घेत अाहेत. हे प्राणी पाणी व चाऱ्याच्या शोधात सातत्याने फिरतात. या प्राण्यांचे कळप शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी बनत असून, या वर्षी तर पीक उगवणीपासून शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत अाहे.

वऱ्हाडात मेळघाट, काटेपूर्णा, ज्ञानगंगा अशी प्रमुख अभयारण्ये अाहेत. याशिवाय अाणखी छोटी अभयारण्येसुद्धा अाहेत. यामध्ये वन्यप्राण्यांची संख्या मोठी अाहे. या जंगलांमधील हिंस्र श्वापदांनी शेतकऱ्यांवर हल्ले केल्याच्या घटना दरवर्षी घडत असतात. याहीपेक्षा प्रामुख्याने रानडुक्कर, रोही, हरणांचे कळप दिवसेंदिवस वाढत चालल्याने मोठी डोकेदुखी बनली अाहे.

हे कळप एखाद्या शेतातून गेल्यास काही पीक खातात, तर काही पीक हे जनवारांच्या खुरांमुळे तूटून पडते. असे प्रकार या वर्षी मोठ्या प्रमाणात समोर येत अाहेत. पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना पीक अंकुरल्यापासूनच कसरत करावी लागत अाहे.

सध्या वऱ्हाडात ५० टक्केसुद्धा सरासरी पेरण्या झालेल्या नाहीत. मात्र जे पीक अंकुरत अाहे त्याचे वन्यप्राण्यांमुळे अधिक नुकसान होत अाहे. सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचे प्रामुख्याने प्राणी नुकसान करतात. रानडुकरे ज्वारी, मका या पिकांची अधिक नासाडी करतात. रात्रीच्या वेळी ३० ते ४० हरिण, रोही, रानडुकरांचा कळप शेतात घुसून नुकतेच अंकुरलेल्या पिकाचे अतोनात नुकसान करीत अाहे.

रानडुकरांचे हल्ले पाहता शेतकरी जीव मुठीत घेऊनच पिकांचे रक्षण करावे लागत अाहे. मात्र एवढे करूनही नुकसान अधिक होत अाहे. अाधीच अार्थिक संकटात सापडलेले शेतकरी यामुळेही चिंतातुर झाले अाहेत. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करीत अाहेत.

शेतीत मशागत, पेरणी, बियाणे, व्यवस्थापन, काढणी, वाहतूक अशा विविध खर्चांसह अाता पिकांच्या संरक्षणाचा देखील खर्च वाढला अाहे. असंख्य शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांपासून पीक वाचवण्यासाठी कुंपण करणे, जाळ्या लावणे किंवा राखणदार ठेवणे अनिवार्य झाले अाहे. या उपाययोजना करणे शक्य नसलेल्या शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतांमध्ये रात्रीच्या वेळी पहारा द्यावा लागत असल्याची वस्तुस्थिती अाहे.  
 

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...