agriculture news in marathi,crop insurance cover for horticulture, pune, maharashtra | Agrowon

पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना पीकविम्याचे कवच
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 मे 2018

पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब, पेरू, चिकू या फळपिकांना पंतप्रधान पीकविमा योजनेचे कवच मिळणार आहे. पीक विमा योजनेत सहभागासाठी पेरूसाठी १४ जून, चिकूसाठी ३० जून, तर डाळिंबासाठी १४ जूलैपर्यंत बॅंकांमध्ये प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे सांगण्यात आले.

पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब, पेरू, चिकू या फळपिकांना पंतप्रधान पीकविमा योजनेचे कवच मिळणार आहे. पीक विमा योजनेत सहभागासाठी पेरूसाठी १४ जून, चिकूसाठी ३० जून, तर डाळिंबासाठी १४ जूलैपर्यंत बॅंकांमध्ये प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे सांगण्यात आले.

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानाधारित फळ पीकविमा योजना २०१८-१९ वर्षांतील फळबागांना लागू करण्यात आली आहे. कमी-जास्त पाऊस, पावसात पडलेले खंड, सापेक्ष आर्द्रता या धोक्यांपासून निर्धारित कालावधीत शेतकऱ्यांना विमा योजनेचे संरक्षण आणि अर्थसाह्य देण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येते.

जिल्ह्यातील डाळींब, पेरू, चिकू या पिकांसाठीच्या विमा योजनेसाठी टाटा एआयजी इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना अनिवार्य असून, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग एेच्छिक आहे.

हवामानबदलामुळे म्हणजेच फूलधारणा व फळधारणेच्या कालावधीत प्रत्येक आठवड्याच्या सरासरी पावसापेक्षा कमी जास्त पावसामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीस विमा संरक्षण देय राहील. शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या केवळ पाच टक्के रक्कम विमा हप्ता म्हणून भरायची आहे.

नुकसानभरपाई ठरविताना महावेध प्रकल्पाअंतर्गत महसूल मंडळ स्तरावरील स्वयंचलित हवामान केंद्राच्या आकडेवारी विचारात घेतली जाणार असल्याने मानवी हस्तक्षेप राहणार नाही. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
 

पीकसंरक्षण कालावधी व शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी भरावी लागणारी रक्कम

पीक संरक्षण कालावधी  विमा हप्ता (हेक्टरी)
पेरू  १५ जून ते १४ जुलै  २७५० रुपये
चिकू १ जुलै ते ३० सप्टेंबर  २७५० रुपये
डाळिंब  १५ जुलै ते ३० डिसेंबर ६०५० रुपये

 

फळ पीकविमा लागू असलेले तालुके

पेरू हवेली, भोर, बारामती, दौंड
चिकू भोर, जुन्नर, शिरूर, बारामती
डाळिंब दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापूर, सासवड, शिरूर, हवेली

 

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात १८९ मंडळात जोरदार पाउस औरंगाबाद : मराठवाड्यातील 421 महसुल मंडळांपैकी तब्...
हिंगोली जिल्ह्यात सोळा मंडळात अतिवृष्टीहिंगोली : जिल्ह्यात मागील चोवीस तासांमध्ये दोन...
परभणीतील २४ मंडळात अतिवृष्टी नदी, नाले...परभणी : जिल्ह्यात बुधवार पासून पावसाचे...
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनादेड : जिल्ह्यातील माहूर, किनवट, भोकर, हिमायतनगर...
कोयनेत पूरस्थिती शक्‍यपाटण, जि. सातारा : कोयना धरण पाणलोट...
कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?सातारा - ‘‘सोसायटीचे एक लाख ३० हजार रुपयांचे...
यवतमाळ जिल्ह्यात पूर परिस्थिती यवतमाळ  : जिल्हयात सुरु असलेल्या संततधार...
राज्यात भेंडी ५०० ते ३००० रुपये...सांगलीत दहा किलोस २५० ते ३०० रुपये  सांगली...
राज्याचा पुरोगामित्वाचा वारसा जपूया :...मुंबई: शेती, पाणी, गुंतवणूक, गृहनिर्माण अशा विविध...
विदर्भात पावसाचे जोरदार कमबॅकनागपूर ः गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या...
शिराळ्यात नागप्रतिमेची पूजाशिराळा, जि. सांगली ः  अनेक वर्षे जिवंत...
अकोल्यात पावसाचे आगमनअकोला : या भागात गेल्या २० पेक्षा अधिक...
एकात्मिक कीड नियंत्रणात फेरोमोन...कामगंध सापळ्यांचा वापर केल्यास कमी खर्चात कीड...
उत्पादनवाढीसाठी एअरोसोल्सद्वारे...पृथ्वीच्या वातावरणामध्ये कृत्रिमरीत्या सल्फेट...
राजकीय सभ्यता व सुसंस्कृतपणा जपणारा एक...पुणे : राजकिय विरोध कितीही असला तरी राजकारणातील...
अटलजी : एका उत्तुंग नेतृत्वाचा अस्तभारताचे माजी पंतप्रधान, देशाचे लोकप्रिय नेते...
देशाने महान पुत्र गमावला : राहुल गांधी नवी दिल्ली : ''आज भारताने महान पुत्र गमावला...
वाजपेयींच्या निधनाने एका युगाचा अंत :...नवी दिल्ली : ''अटलजींच्या निधनाने एका युगाचा...
अजातशत्रू, मुरब्बी राजकारणी : अटल...शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे,...
...या आजारांनी वाजपेयींना ग्रासले होतेनवी दिल्लीः माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...