वऱ्हाडात पावसाचा जोर अोसरताच मशागतीची कामे वेगात

या वर्षी अातापर्यंत पीक परिस्थिती समाधानकारक असून, मोठ्या पावसाची अावश्यकता अाहे. सध्या सोयाबीनवर कीडीचा प्रादुर्भाव झाल्याने चिंता वाढली अाहे. - राजू घोडे, शेतकरी, उंबर्डा बाजार, ता. कारंजा, जि. वाशीम.
शेतीत मशागती सुुरु
शेतीत मशागती सुुरु

अकोला   : गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर अोसरल्याने अाता शेतीतील मशागतीच्या कामांना पुन्हा एकदा जोमाने सुरुवात झाली अाहे. पिके सर्वत्र वाढीच्या अवस्थेत अाहेत. वऱ्हाडातील जिल्ह्यांमध्ये या वर्षीदेखील पावसाच्या अनियमितपणामुळे एकाच वेळी पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. परिणामी, शेतांमध्ये विविध प्रकारची कामे सुरू अाहेत.

मृगात पाऊस सुरू झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली; त्यांची पिके अाता दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधीची झाली अाहेत. तर, काही भागातील पिके अवघी दहा ते पंधरा दिवसांची अाहेत. अद्याप अकोला, बुलडाणा जिल्ह्यात काही क्षेत्रांवर पेरणीसुद्धा व्हायची अाहे. अशा स्थितीत शेतीतील मशागतीची कामे वेगवेगळ्या टप्प्यांवर अाहेत.

असंख्य शेतातील पिकांमध्ये सध्या डवरणीची कामे अधिक प्रमाणात होत अाहेत. मागील अाठवड्यांत संततधार पाऊस झाल्याने पिकांमध्ये तण वाढले असून, हे तण नष्ट करण्यासाठी असंख्य शेतकरी तणनाशकाचा वापर करीत अाहेत. कुठे निंदण, डवरणीच्या माध्यमातून तण नष्ट केले जात अाहे. तणाची वाढ अधिक झालेली असल्याने तणनाशकाचा तितकासा उपयोग होताना दिसत नाही. परिणामी, पर्यायी उपाययोजना केल्या जात अाहेत.

डवरणीची दिवसाची मजुरी १६०० रुपयांपर्यंत पोचली अाहे. यात बैलजोडी व एक व्यक्तीला १२०० रुपये व इतर दोन डवरे धरण्यासाठी दोन मजुरांना एकूण ४०० रुपये मजुरी द्यावी लागत अाहे. निंदणासाठी दिवसभराची मजुरी १२५ ते १७५ रुपयांपर्यंत द्यावी लागत अाहे.

या विभागातील तीनही जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने सोयाबीनची लागवड सर्वाधिक झालेली असून, पिकावर पाने खाणारी, पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत असल्याने शेतकरी कीड नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांमध्ये व्यस्त अाहेत.महिना, दीड महिना कालावधीची पिके झालेल्या शेतांमध्ये रासायनिक खतांची मात्रा शेतकरी देत अाहेत.

पावसाने उघडीप दिल्याने शेतीतील कामांसाठी मजुरांची मागणी वाढली अाहे. डवरणी, निंदण, फवारणीच्या कामांसाठी मजुरांची मागणी वाढल्याने मजुरीत २५ ते ४० रुपयांपर्यंत वाढ झाली अाहे. मागणीच्या तुलनेत अपेक्षित मजूर मिळत नसल्याने मानवचलीत, ट्रॅक्ट्ररचलीत यंत्राद्वारेही कामे करून घेतली जात अाहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com