agriculture news in Marathi,cyclone in both ocean, Maharashtra | Agrowon

दोन्ही समुद्रांत वादळांची निर्मिती
टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

पुणे  : अरबी समुद्रात ‘लुबन’ चक्रीवादळ घोंगावत असतानाच बंगालच्या उपसागरामध्ये मंगळवारी (ता. ९) कमी तीव्रतेच्या वादळाची (डीप डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. ओमानच्या दिशेकडे जात असलेल्या ‘लुबनने’ अरबी समुद्रातील बाष्प खेचून घेतले आहे. तर बंगालच्या उपसागरात आज चक्रीवादळाची निर्मिती होणार असल्याचे पूर्व किनाऱ्यांवर जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात मुख्यत: निरभ्र वातावरण असून, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  

पुणे  : अरबी समुद्रात ‘लुबन’ चक्रीवादळ घोंगावत असतानाच बंगालच्या उपसागरामध्ये मंगळवारी (ता. ९) कमी तीव्रतेच्या वादळाची (डीप डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. ओमानच्या दिशेकडे जात असलेल्या ‘लुबनने’ अरबी समुद्रातील बाष्प खेचून घेतले आहे. तर बंगालच्या उपसागरात आज चक्रीवादळाची निर्मिती होणार असल्याचे पूर्व किनाऱ्यांवर जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात मुख्यत: निरभ्र वातावरण असून, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  

अरबी समुद्रात सोमवारी (ता. ८) लुबन चक्रीवादळाची निर्मिती झाली. सकाळी साडेआठ वाजता हे वादळ सलालाह (आमान) किनाऱ्यापासून ८०० किलोमीटर तर सोकाट्रा (येमन) बेटापाून ९४० किलोमीटर अाग्नेय दिशेला समुद्रात होते. लुबनचे अतितीव्र वादळात रूपांतर होणार असून, शनिवारपर्यंत (ता. १३) ते येमन आणि दक्षिण ओमानच्या किनाऱ्याला धडकणार आहे. या चार दिवसांत समुद्रात ताशी ११० ते १३५ किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहणार आहे. 

दोन्ही वादळी प्रणालीमुळे समुद्र खवळणार असल्याने दोन्ही किनाऱ्यांवर मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. पश्‍चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि मिझोराम, त्रिपुरासह ईशान्य भारतातील राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर अरबी समुद्रातील बाष्प ओमानकडे खेचले गेल्याने अाजपासून कोकणासह पश्‍चिम किनाऱ्यावर हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात उद्यापर्यंत (ता. १०), तर विदर्भात शुक्रवारी (ता. १२) तुरळक ठिकाणी पाऊस शक्य असून, मराठवाड्यात कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.

उन्हाची ‘ताप’ कायम
पावसाच्या उघडीपीनंतर राज्यात उन्हाची वाढलेली ताप कायम आहे. मंगळवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापामनाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी दिवसाच्या तापमानाचा पारा ३५ अंशांच्या वर गेला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात रात्रीचे तापमान सरासरीच्या खाली उतरले आहे. उस्मानाबाद येथे राज्यातील नीचांकी १५.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेल्याचे पुणे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले. 

मंगळवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.८ (२१.८), नगर - (१८.४) जळगाव ३७.२ (२०.०), कोल्हापूर ३३.०(२२.४), महाबळेश्‍वर २७.०(१८.२), मालेगाव ३७.० (२१.४), नाशिक ३३.३ (१९.२), सांगली ३२.६ (२१.१), सातारा ३२.१ (२०.७), सोलापूर ३६.१ (२३.६), सांताक्रूझ ३७.१ (२६.५), अलिबाग ३४.४ (२५.५), रत्नागिरी ३५.२ (२४.०), डहाणू ३६.१ (२५.३), आैरंगाबाद ३४.८ (१८.०), परभणी ३५.५(१७.५), नांदेड ३४.० (२२.५), उस्मानाबाद - (१५.७), अकोला ३७.० (२१.२), अमरावती ३६.६ (२०.६), बुलडाणा ३३.८ (२०.३), चंद्रपूर ३५.० (२१.५), गोंदिया ३५.५ (२१.५), नागपूर ३५.५ (१९.८), 
वर्धा ३५.५ (१९.८), यवतमाळ ३६.० (१९.४).

इतर अॅग्रो विशेष
कडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...
भारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...
मुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...
खरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...
सरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...
नर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...
दुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....
नांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड   ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...
वाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...
लढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
तुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...
सूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
ठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर  ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...