agriculture news in marathi,dam storage status, yavatmal, maharashtra | Agrowon

इसापूर धरणात केवळ १४ टक्के साठा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017
यवतमाळ : विदर्भ - मराठवाडा सीमेवरील पैनगंगा नदीवर असलेल्या इसापूर धरणात केवळ १४ टक्‍के साठा शिल्लक आहे. परिणामी रब्बी हंगामातील सव्वा लाख हेक्‍टर क्षेत्रावरील सिंचन अधांतरी राहणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 
 
यवतमाळ : विदर्भ - मराठवाडा सीमेवरील पैनगंगा नदीवर असलेल्या इसापूर धरणात केवळ १४ टक्‍के साठा शिल्लक आहे. परिणामी रब्बी हंगामातील सव्वा लाख हेक्‍टर क्षेत्रावरील सिंचन अधांतरी राहणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 
 
विदर्भ मराठवाड्यासाठी महत्त्वाचा सिंचन स्त्रोत असलेला पैनगंगा नदीवरील इसापूर धरणात केवळ १४ टक्‍के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या सिरसम, खंडाळा, अनसिंग, गोरेगाव, गोवर्धन, शिरपूर, डोणगाव, सारखेडा, वाशीम, रिसोड, मेहकर या परिसरात कमी पर्जन्यमान झाले. पाच महिन्याच्या कालावधीत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात फक्‍त ७४० मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे विदर्भ मराठवाड्यातील एक लाख २५ हजार ४९० हेक्‍टरवरील रब्बी हंगाम धोक्‍यात आल्याचे चित्र आहे.
 
धरणाच्या पाण्यातूनच विदर्भातील ८४ किलोमीटर लांबीच्या डाव्या कालव्याद्वारे यवतमाळ जिल्हयातील १९ हजार ३२० हेक्‍टर जमीन सिंचनाखाली येते. ११७ किलोमीटर लांबीच्या उजव्या कालव्याद्वारे मराठवाड्याच्या नांदेड जिल्हयातील ९२ हजार २१० हेक्‍टर जमिन व हिंगोली जिल्हयातील १३ हजार ९६० हेक्‍टरवरील शेती सिंचनाखाली येते.
 
मागील वर्षी या महिन्यात धरणात ४२ टक्‍के पाणीसाठा होता. त्यावर संपूर्ण लाभक्षेत्रात सिंचन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. यंदा स्थिती चिंताजनक आहे. रबी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. अनेकांनी बोअरवेल खोदत पर्यायी सिंचनाचे मार्ग शोधले. अल्पभूधारक शेतकऱ्यांची मात्र कोंडी झाली आहे.

इतर ताज्या घडामोडी
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी...बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने...
सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने...सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला...
जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे...जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून...
आषाढी वारीत शासकीय महापूजेचा वेळ...सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍...
जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुलावरून...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
वऱ्हाडात महाबीज बियाणे मिळण्यापूर्वी...अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम...
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात...सातारा  : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८...
पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे?...नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल...