agriculture news in marathi,delay for ferry squad appointment, jalgaon, maharashtra | Agrowon

केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची प्रतीक्षा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी खरेदीदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, फसवणूक रोखण्यासाठी रावेर, जळगाव, चोपडा, यावल, मुक्ताईनगर आदी बाजार समित्यांकडून भरारी पथके नियुक्त करण्याची प्रतीक्षा आहे.

खेडा खरेदीसंबंधी अनेकदा खरेदीदार जे दर जाहीर झालेले असतात, त्यापेक्षा १०० ते १५० रुपये क्विंटलमागे कमी देतात. यात शेतकऱ्यांची मोठी लूट होते. ही फसवणूक थांबविण्यासाठी मध्यंतरी जळगाव बाजार समितीने भरारी पथकांची नियुक्ती केली जाईल, असे म्हटले होते. परंतु ही नियुक्ती झालेलीच नाही. खेडा खरेदीमध्ये व्यापारी थेट शेतात जाऊन केळी घेतात.

जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी खरेदीदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, फसवणूक रोखण्यासाठी रावेर, जळगाव, चोपडा, यावल, मुक्ताईनगर आदी बाजार समित्यांकडून भरारी पथके नियुक्त करण्याची प्रतीक्षा आहे.

खेडा खरेदीसंबंधी अनेकदा खरेदीदार जे दर जाहीर झालेले असतात, त्यापेक्षा १०० ते १५० रुपये क्विंटलमागे कमी देतात. यात शेतकऱ्यांची मोठी लूट होते. ही फसवणूक थांबविण्यासाठी मध्यंतरी जळगाव बाजार समितीने भरारी पथकांची नियुक्ती केली जाईल, असे म्हटले होते. परंतु ही नियुक्ती झालेलीच नाही. खेडा खरेदीमध्ये व्यापारी थेट शेतात जाऊन केळी घेतात.

केळी खरेदीनंतर शेतकरीही फारसे वाद घालण्याच्या मानसिकतेत नसतात, कारण त्यांना केळीचे पैसे व्यापाऱ्याकडून घ्यायचे असतात. परंतु या खरेदीच्या व्यवहारांकडे लक्ष ठेवण्यासाठी पथके नियुक्त करून या पथकांची केळी पट्ट्यात पाहणी केली, शेतकऱ्यांना रोज भेटी दिल्यास व्यापारी फसवणूक करणार नाहीत. सचोटीने व्यवहार होतील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

केळीचे दर रावेर बाजार समिती जाहीर करते; परंतु या दरांची अंमलबजावणी बाजार समिती करीत नाही. नियमनमुक्तीमुळे केळीच्या खेडा खरेदीतून कुठलेही शुल्क वसूल करता येत नसल्याने बाजार समित्या या खेडा खरेदीसंबंधी कोणतीही कार्यवाही, नियंत्रण आणायला तयार नसल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

इतर ताज्या घडामोडी
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...