agriculture news in marathi,demand for garm procurement centers,dhule, maharashtra | Agrowon

धुळ्यात हरभरा खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याची मागणी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 एप्रिल 2018
धुळे  ः धुळे जिल्ह्यातही हरभरा व तुरीला हमीभाव मिळत नसल्याची स्थिती असून, शासनाने तातडीने हरभऱ्याची हमीभावात खरेदी करण्यासाठी केंद्रांची संख्या वाढवावी, मोठ्या गावांमध्ये खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
 
धुळे  ः धुळे जिल्ह्यातही हरभरा व तुरीला हमीभाव मिळत नसल्याची स्थिती असून, शासनाने तातडीने हरभऱ्याची हमीभावात खरेदी करण्यासाठी केंद्रांची संख्या वाढवावी, मोठ्या गावांमध्ये खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
 
शहादा (जि. नंदुरबार) येथे मागील आठवड्यात हमीभावापेक्षा कमी दरात शेकऱ्यांचे धान्य खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तीव्र आंदोलनानंतर गुन्हे दाखल झाले. यानंतर काही दिवस अडतदारांनी लिलाव बंद ठेवले. कारण आपल्याला हमीभावाएवढा दर कुणी देत नाही, खरेदी नाही. अशा स्थितीत आपण हरभरा व इतर धान्य कसे खरेदी करणार, असा प्रश्‍न अडतदारांनी उपस्थित केला होता.
 
परंतु या आठवड्यात बाजार समिती हळूहळू पूर्ववत झाली. हरभऱ्याचे लिलाव सुरू आहेत. परंतु शेतकऱ्यांची संमती घेऊन अडतदार खरेदी करीत आहेत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयासही यासंबंधीची माहिती दिली आहे. धुळे जिल्ह्यातही शिरपूर, शिंदखेडा, धुळे तालुक्‍यात हरभऱ्याची पेरणी बऱ्यापैकी झाली होती. परंतु जिल्ह्यातही हमीभावाचा प्रश्‍न आहे.
 
हरभऱ्याला कमाल दर प्रतिक्विंटल ३८०० रुपयांपर्यंत आहे; तर यापेक्षा कमी दरातही हरभऱ्याची खेडा खरेदी सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकरी अधिक दिवस घरात धान्य साठवू शकत नाही. आता पुढे खरिपाची तयारी सुरू करावी लागेल. त्यासाठी पैशांची गरज असते. उधार, उसनवारी, असे मुद्देही शेतकऱ्यांसमोर आहेत. अशा स्थितीत जिल्ह्यात हरभरा खरेदी केंद्र बेटावद (ता. शिंदखेडा), न्याहळोद (ता. धुळे), होळनाथे (ता. शिरपूर), कुसुंबे (ता. धुळे) आदी ठिकाणी सुरू करावेत. स्थानिक सहकारी संस्थांना त्यासाठी विश्‍वासात घेतले जावे, अशी मागणी शेतकरी व संघटनांनी केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...