agriculture news in marathi,deprived of soyaben grant, washim, maharashtra | Agrowon

खासगी बाजार समितीत सोयाबीन विक्री करणारे शेतकरी अनुदानापासून वंचित
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017
वाशीम : जिल्ह्यातील मालेगाव येथील खासगी बाजार समितीने वेळेत माहिती सादर न केल्याने सोयाबीन उत्पादकांसाठी शासनाने दिलेले अनुदान मिळण्यापासून हे शेतकरी वंचित राहणार असून, या प्रकरणी पेच तयार झाला आहे. 
 
वाशीम : जिल्ह्यातील मालेगाव येथील खासगी बाजार समितीने वेळेत माहिती सादर न केल्याने सोयाबीन उत्पादकांसाठी शासनाने दिलेले अनुदान मिळण्यापासून हे शेतकरी वंचित राहणार असून, या प्रकरणी पेच तयार झाला आहे. 
 
गेल्या हंगामात शासनाने ऑक्‍टोबर ते डिसेंबर या काळात बाजार समितीत सोयाबीन विक्री केलेल्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये एवढे अनुदान २५ क्विंटल मर्यादेपर्यंत देण्याचे जाहीर केले. या अनुदानाचा वाशीम जिल्ह्याला १४ कोटी २९ लाख रुपये निधीसुद्धा प्राप्त झाला. लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान वळते केले जात आहे; परंतु खासगी बाजार समितीत सोयाबीन विकलेले शेतकरी या मदतीपासून वंचित राहत असल्याची बाब निदर्शनास आली.
 
मालेगाव येथील ना. ना. मुंदडा खासगी बाजार समितीने त्यांच्याकडे खरेदी केलेल्या सोयाबीनची माहिती वेळेत ऑनलाइन सादर केली नसल्याने अनुदानापासून वंचित राहत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे करत न्याय देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. 
 
बाजारभाव व हमीभाव यातील तफावत देण्याच्या उद्देशाने शासनाने प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान सोयाबीनसाठी जाहीर केले आहे. यासाठी शेतकऱ्यांचे बाजार समितीमार्फत अर्ज मागविण्यात आले. त्या अर्जांची छाननी करून अंतिम अर्ज प्रशासनाने शासनाकडे पाठविले होते. याला मंजुरी मिळून वाशीम जिल्ह्यासाठी १४ कोटी २९ लाखांचा निधीसुद्धा मिळाला. हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वळता होत असतानाच दुसरीकडे खासगी बाजार समितीने माहितीच सादर न केल्याने तेथे सोयाबीन विकणारे असंख्य शेतकरी अनुदानापासून वंचित राहिल्याचे समोर आले.
 
या बाजार समितीत एक ऑक्‍टोबर ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत ६७ हजार ५२९ क्विंटल सोयाबीनची खरेदी केल्या गेली. यासाठी सुमारे एक कोटी ३५ लाख रुपये अनुदान मिळाले असते. परंतु खरेदीची माहिती ऑनलाइन पद्धतीने वेळेत न दिल्याने त्या ठिकाणी विक्री करणारे शेतकरी अनुदान यादीतच नाहीत. नेट कनेक्‍टिव्हीटीच्या अडचणीमुळे ही माहिती वेळेत देणे शक्‍य झाले नसल्याचे या बाजार समिती प्रशासनाकडून आता सांगितले जात आहे.
 
वाशीम जिल्ह्यात चार खासगी बाजार समित्या आहेत. बाजार समितीने खरेदी केलेल्या सोयाबीनची नोंद ऑनलाइन पद्धतीने दररोज करून ती माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयात देणे बंधनकारक होते. परंतु मालेगाव येथील खासगी बाजार समितीकडून अशी माहिती वेळेत सादर केली गेली नाही. त्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहले.
 
त्याबाबतचे निवेदन जिल्हा उपनिबंधकांकडे दाखल झाले असून याही शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी सांगितले आहे. अनुदानापासून वंचित राहणारे शेतकरी याप्रकरणी शासनाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी करीत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...