agriculture news in marathi,dhananjay munde ask the qustion about electricity bill, mumbai, maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांकडून सक्तीने वीजबिलाची थकबाकी वसूल करताच कशी : मुंडे
टीम अॅग्रोवन
रविवार, 30 सप्टेंबर 2018

मागील काळातील पीक नुकसानीचे अनुदान अद्याप मिळालेले नाही, फसवी कर्जमाफी केली, पीकविमा मिळत नाही, महागाईमुळे शेतकरी त्रस्त आहेत, शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. चोहोबाजूने शेतकरी संकटात सापडले असतांना महावितरणची ही जुलमी वसुली सुरु आहे. हे पत्रक तातडीने मागे घ्यावे, शेतकऱ्यांकडील सक्तीची वीजबिल वसुली थांबवावी. इतकेच नाही तर त्यांचे वीजबील माफ करून त्यांना दिलासा द्यावा.
- धनंजय मुंडे, विरोधी पक्ष नेते, विधान परिषद.

मुंबई : राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे संकटात असताना त्यांना आधार देण्याऐवजी, मदत करण्याऐवजी शेतकऱ्यांकडील वीज बिलाची थकबाकी सक्तीने वसूल करण्याचे आदेश कसे काय देता? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केला आहे.

राज्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे गेली आहेत. अशावेळी शेतातील उपलब्ध थोड्याशा पाण्यावर पिके जगवण्याची शेतकऱ्यांना शेवटची आशा उरली आहे. शेतकरी ही पिके जगवण्याचा प्रयत्न करत असतानाच महावितरणने एक पत्रक काढून त्यांच्याकडील कृषी पंपाची, विजेची थकबाकी ३ हजार रुपये, ५ हजार रुपये याप्रमाणे वसूल करण्याचे आदेश काढले असल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.

महावितरणच्या संचालकांनी १९ सप्टेंबरला राज्यातील सर्व मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंत्यांना पत्र पाठवून शेतकऱ्यांकडील वीजबिलाची वसुली करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. हे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत १८ ऑगस्टला झालेल्या एका बैठकीनुसार काढण्यात आल्याचेही या पत्रात म्हटले आहे. शासनाच्या या सक्तीच्या वीज बिल वसुलीबाबत धनंजय मुंडे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  
 

इतर ताज्या घडामोडी
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...