agriculture news in marathi,District collector declared by Nashik District Bank | Agrowon

नाशिक जिल्हा बँकेतर्फे शंभर थकबाकीदार जाहीर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 जुलै 2018

नाशिक  : नाशिक जिल्हा बँकतर्फे जिल्ह्यातील ऐपतदार, मोठे बागायतदार व हेतुपुरस्कर थकबाकी झालेल्या १० लाखांवरील १०० थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये माजी अध्यक्ष, संचालक पुत्र अशा अनेकांचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे. अशा सभासदांकडे असलेली थकबाकी व त्यावर होणारे व्याज येत्या ७ जुलैपर्यंत भरणा करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूचित करून थकबाकीदार सभासदांनी कर्जाची रक्कम त्वरित भरणा करून बँकेस सहकार्य करावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष केदार आहेर यांनी केले आहे.

नाशिक  : नाशिक जिल्हा बँकतर्फे जिल्ह्यातील ऐपतदार, मोठे बागायतदार व हेतुपुरस्कर थकबाकी झालेल्या १० लाखांवरील १०० थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये माजी अध्यक्ष, संचालक पुत्र अशा अनेकांचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे. अशा सभासदांकडे असलेली थकबाकी व त्यावर होणारे व्याज येत्या ७ जुलैपर्यंत भरणा करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूचित करून थकबाकीदार सभासदांनी कर्जाची रक्कम त्वरित भरणा करून बँकेस सहकार्य करावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष केदार आहेर यांनी केले आहे.

जिल्हा बँकेला पूर्वपदावर आणण्याकरिता आहेर यांनी कर्ज वसुलीसाठी जोरदार मोहीम चालू केली आहे. मार्चअखेर २७६९.६१ कोटी रुपये वसुलीस पात्र होते. ३० जूनअखेर ७८९ कोटी मुद्दल व व्याजाची २७२ कोटी रकम अशी एकूण ३० टक्के वसुली झालेली आहे. तसेच शैक्षणिक संंस्था, दूध प्रक्रिया संस्था, पतसंंस्था यांच्या माध्यमातून बिगरशेती कर्जाची ३ महिन्यांत ४ कोटींची वसुली झाली असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

२३७ कोटींचे पीक कर्जवाटप
जिल्हा बँकेला शासनाने पीककर्ज वितरणासाठी ५०० कोटीचा लक्षांक दिलेला आहे. आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खरे यांच्या अधिपत्याखाली सर्व व्यवस्थापकांनी पीक कर्जवाटपाकरिता जिल्हाभर दौरा केला. सर्व तालुका निबंधक, सहायक निबंधक, विशेष वसुली अधिकारी, विभागीय अधिकारी, गट सचिव यांच्या तालुका निहाय बैठका घेऊन कृती आराखडा तयार करण्यात आला. मागील १२ दिवसांत १३५ कोटींचे पीककर्ज वितरण केलेले आहे. बँकेने ३० जूनअखेर १३ हजार ३४८ सभासदांना २३७ कोटींचे पीककर्ज वितरण केलेले आहे.

इतर बातम्या
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
पुणे विभागात हरभरा, गव्हाची काढणी...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने रब्बी हंगामातील गहू...
पूर्व भागात कृष्णा, वारणा नद्या पडल्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पूर्व भागात कृष्णा व...
ताकारीच्या तिजोरीत १३ कोटी शिल्लकवांगी, जि. सांगली ः मागील १५ वर्षांपासून दरवर्षी...
गिरणा नदीतून पाण्याची ग्रामस्थांना...जळगाव ः पिण्याच्या पाण्यासंबंधी सोडलेले गिरणा...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
दुबळवेल ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कारवाशीम : नागरिकांना अावश्यक असलेल्या पायाभूत...
नांदेड, परभणी, हिंगोलीत अन्नत्याग आंदोलननांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
दुष्काळी भागाला मिळतोय चिंचेचा आधारशिरूर कासार, जि. बीड ः दुष्काळाच्या गंभीर झळा...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या कायम ः...राहुरी विद्यापीठ, जि. नगर : विविध पिकांच्या...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...