agriculture news in marathi,drought situation in khanapur, sangli, maharashtra | Agrowon

खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई
टीम अॅग्रोवन
रविवार, 23 सप्टेंबर 2018

सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. टेंभू उपसा सिंचन योजनेतील पाणी अवघ्या सहा किलोमीटरवर आले आहे. मात्र परिसरातील शेतीला पाणी मिळत नाही, यामुळे खानापूर घाटमाथ्यावरील पाणीटंचाई कधी दूर होणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागला आहे.

सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. टेंभू उपसा सिंचन योजनेतील पाणी अवघ्या सहा किलोमीटरवर आले आहे. मात्र परिसरातील शेतीला पाणी मिळत नाही, यामुळे खानापूर घाटमाथ्यावरील पाणीटंचाई कधी दूर होणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागला आहे.

खानापूर शहरासह अनेक गावांत पावसाळ्यातही टॅंकरने पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. खानापूरला ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. त्यालाही दोन वर्षे झाली. मात्र अजून पिण्याच्या पाण्यासाठी नगरपंचायतीला शासनाकडून स्वतंत्र निधी, अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे नगरपंचायतीचा नफा फंडिंगचा पैसा हा फक्त पिण्याच्या पाण्यावर खर्च होत आहे. पिण्याच्या पाण्याचे आतापर्यंत नेटके नियोजन केले. यापुढे मोठ्या पावसाने हजेरी नाही लावली तर मात्र घाटमाथ्याला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागेल, अशी स्थिती आहे.

घाटमाथ्याच्या पूर्वेस अवघ्या सहा-सात किलोमीटरवरून टेंभूचे पाणी वाहते. त्यामुळे ‘पाणी उशाला व कोरड घशाला’ अशी स्थिती झाली आहे. खानापूर शहरास सध्या टॅंकरने रोज तीन लाख लिटर पाणी पुरवले जाते. काही स्थानिकांच्या बोअरवेलमधून पाणी घेऊन शहराची तहान भागवली जाते. शहराचे दोन भाग करून एक दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहराच्या पूर्वेस पाझर तलाव आहे. पाच वर्षांपासून तो पावसाच्या पाण्याने निम्मासुद्धा भरलेला नाही. त्यामुळे सातत्याने पिण्याच्या, शेतीच्या पाण्याचा प्रश्न शहर, परिसरास भेडसावतो आहे.

गोरेवाडी कालव्याचे पाणी कधी?
पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी टेंभू योजनेचे पाणी तातडीने घाटमाथ्यावर आणणे गरजेचे आहे. गोरेवाडी कालव्याची निविदा प्रसिद्ध झाली. मात्र नेमके पाणी कधी व किती गावांना मिळणार, असा प्रश्न घाटमाथ्यावरील ग्रामस्थांना पडला आहे.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...