गोंदिया जिल्ह्यात २ लाख हेक्‍टरवर पेरण्या खोळंबल्या

गोंदिया जिल्ह्यात पावसाअभावी २ लाख हेक्‍टरवर पेरण्या खोळंबल्या
गोंदिया जिल्ह्यात पावसाअभावी २ लाख हेक्‍टरवर पेरण्या खोळंबल्या

गोंदिया ः राइससिटी असा लौकिक असलेल्या गोंदिया जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने १ लाख ९१ हजार हेक्‍टरवरील पेरण्या खोळंबल्या आहेत. जून महिना संपत आला असताना वरुणराजा न बरसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात धानाची लागवड सर्वाधिक होते. कृषी विभागाने या वर्षी १ लाख ९१ हजार हेक्‍टर क्षेत्रावर पिकाच्या लागवडीचे नियोजन केले आहे. दरवर्षी शेतकरी मृगाचा दमदार पाऊस झाल्यानंतर पेरणीला सुरवात करतात. त्याकरिता सुरवातीला पऱ्हे (रोपवाटिका) तयार केली जाते. त्यानंतर लवकरच रोवणी करण्यावर शेतकऱ्यांचा भर राहतो. ही प्रक्रियाच उत्पादन वाढ किंवा उत्पादकता कमी करण्यास पूरक ठरते. त्यामुळे रोवणीची वेळ चुकू नये, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची राहते.  यंदा मृग नक्षत्र कोरडा गेला असून मॉन्सून अद्यापही सक्रिय झालेला नाही. त्यामुळे पावसाबाबत अनिश्चिततेचे वातावरण आहे. काही शेतकरी धूळपेरणी करून जोखीम स्वीकारण्याच्या मानसिकतेत आहेत; परंतु अपेक्षित ओल नसल्याने ही जोखीम पत्करू नये, असा सल्लावजा आवाहन कृषी विभागाने केले आहे. काही शेतकऱ्यांनी हा सल्ला मानत पुन्हा आठ ते दहा दिवस पावसाची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पाऊस लांबल्यास, पेरण्या लांबतील, असे जाणकार सांगतात. त्याचा उत्पादकतेवरही परिणाम होणार आहे. शेतीची कामे खोळंबल्याने मजुरांनादेखील रोजगाराची प्रतीक्षा लागून आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com