agriculture news in marathi,employment guarantee scheme status, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात नरेगा कामांवर सात हजार मजूर कार्यरत
टीम अॅग्रोवन
रविवार, 8 एप्रिल 2018

नगर : मजुरांच्या रोजगारासाठी जिल्हाभरात सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा)च्या १७०० कामांवर सध्या सात हजार मजूर कार्यरत आहेत. याशिवाय मागणी आली की लगेच सुरू होतील अशी तब्बल ३४ हजार ६५० कामे मंजूर आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेतील रोजगार हमी विभागातून देण्यात आली.

ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार मिळावा, यासाठी सिंचन विहिरींसह सुमारे २४ प्रकारची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (नरेगा) केली जातात.ग्रामपंचायत, कृषी, वनविभाग, सामाजिक वनीकरण, लघुपाटबंधारे यासह अन्य यंत्रणामार्फत ही कामे केली जात आहेत.

नगर : मजुरांच्या रोजगारासाठी जिल्हाभरात सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा)च्या १७०० कामांवर सध्या सात हजार मजूर कार्यरत आहेत. याशिवाय मागणी आली की लगेच सुरू होतील अशी तब्बल ३४ हजार ६५० कामे मंजूर आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेतील रोजगार हमी विभागातून देण्यात आली.

ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार मिळावा, यासाठी सिंचन विहिरींसह सुमारे २४ प्रकारची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (नरेगा) केली जातात.ग्रामपंचायत, कृषी, वनविभाग, सामाजिक वनीकरण, लघुपाटबंधारे यासह अन्य यंत्रणामार्फत ही कामे केली जात आहेत.

जिल्हाभरात ग्रामपंचायतीची १२२७ व यंत्रणांची ४७९ अशी १७०६ कामे सुरू असून ग्रामपंचायतीच्या कामांवर ४४४६ तर यंत्रणेच्या कामावर २५५४ असे सात हजार मजूर काम करत आहेत. याशिवाय २५ लाख २९ मजुरांना रोजगार उपलब्ध होईल, अशी ग्रामपंचायतीची २१ हजार १९५ तर यंत्रणेची १३ हजार ४५५ अशी ३४ हजार ६५० कामे मंजूर आहेत.

ग्रामपंचायतीकडे मंजूर असलेल्या कामातून २१ लाख ३१ हजार दिवस तर यंत्रणेच्या कामांतून २५ लाख २९ हजार दिवस असा ४६ लाख ६० हजार दिवस हजार मजुरांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो असे सांगण्यात आले. जिल्हाभरातील ग्रामपंचायती आणि मजुरांच्या तुलनेत कामांची आणि कामावर असलेल्या मजुरांची संख्या मात्र मोजकीच आहे.

तालुकानिहाय कामे (कंसात मजूर संख्या) ः अकोले ः १७४ (७०८), जामखेड ः २२७ (१०५४), कर्जत ः २०५ (६६४), कोपरगाव ः ४९(१३७), नगर ः ९९ (३९२), नेवासा ः ३४ (१५३), पारनरे ः ६४ (५६०), पाथर्डी ः १२७ (५३०), राहाता ः ९५ (२५८), राहुरी ः ५९ (२९०), संगमनेर ः १३१ (८४२). शेवगाव ः ७३ (३३६), श्रीगोंदा ः १९३ (६०४), श्रीरामपूर ः १७६ (४७१).

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...