agriculture news in marathi,farm produce mortgage scheme status, marthwada, maharashta | Agrowon

चार जिल्ह्यांतील ५८ शेतकऱ्यांनी घेतला `शेतीमाल तारण`चा लाभ
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

सर्व बाजार समित्यांना शेतीमाल तारण योजनेच्या प्रचार, प्रसिद्धीसाठी पोस्टर देण्यात आले आहेत. काम अजून पूर्ण झाले नाही, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत योजनेची माहिती पोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

- महेश साळुंके पाटील, उपसरव्यवस्थापक, राज्य पणन मंडळ, विभागीय कार्यालय औरंगाबाद. 
औरंगाबाद : ‘पणन’च्या औरंगाबाद विभागातील चारही जिल्ह्यांत यंदा आतापर्यंत केवळ ५८ शेतकऱ्यांनी शेतीमाल तारण योजनेचा लाभ घेतला असून योजनेच्या नियमात बदल करूनही शेतकरी या योजनेत सहभागी होत नसल्याचे चित्र आहे.
 
शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीमालाची मूल्यसाखळीत होणारी लूट थांबविण्यासाठी शेतमाल तारण योजना सुरू केली. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या या योजनेसाठी शासन इच्छुक बाजार समित्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचा खेळता निधीही देते. तरीही ना बाजार समित्या या योजनेच्या प्रचार प्रसारासाठी उत्साही दिसतात ना योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी पुढाकार घेतांना दिसतात. त्यामुळे शासनाने नियमात केलेले बदल शेतकऱ्यांपर्यंत पोचले की नाही किंवा योजना शेतकऱ्यांच्या उपयोगाची कशी हे पटवून देण्यात प्रशासकीय यंत्रणा किंवा संबंधित बाजार समित्यांची यंत्रणा अपयशी ठरते आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे.
 
औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत एकूण ३६ बाजार समित्या व ७२ उपबाजार आहेत. यापैकी केवळ बारा बाजार समित्यांमध्ये शेतीमाल तारण योजना सुरू आहे. त्यामध्ये फुलंब्री, औरंगाबाद, सिल्लोड, वसमत, हिंगोली, जवळबाजार, मानवत, परभणी, अंबड, परतूर, जालना, भोकरदन आदी बाजार समित्यांचा समावेश आहे.
 
या बाजार समित्यांमध्ये आजवर केवळ ५८ शेतकऱ्यांनीच शेतीमाल तारण योजनेत सहभाग नोंदवत आपला ३०५८ क्‍विंटल शेतीमाल तारण ठेवला आहे. त्यापोटी बाजार समीत्यांनी ५१ लाख ५९ हजारांचे कर्ज वाटप केले असून कृषी पणन मंडळाने या बाजार समित्यांना ६० लाख ४ हजार रुपये तारण ठेवलेल्या शेतीमालाच्या बदल्यात प्रतिपूर्तीही केली आहे.
विशेष म्हणजे ज्या बाजार समित्या स्वनिधीतून शेतमाल तारण योजना राबवितात त्यांना तीन टक्‍के अनुदान शासनाकडून दिले जाते. 

इतर ताज्या घडामोडी
कृषी, परराष्ट्र, रोजगार, इंधनाच्या...नवी दिल्ली : मागील चार वर्षात मोदी सरकार...
पिवळी डेझी लागवड कशी करावी?पिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....
निशिगंध लागवडीसाठी निचरा असलेली जमीन...निशिगंध पिकाची लागवड सोपी असून, तिचा लागवड खर्चही...
काळी मिरी कशी तयार करतात?काळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन...
वनस्पतींना रोगापासून वाचविण्यासाठी...वनस्पती आणि रोगकारक सूक्ष्मजीव यांच्यामध्ये...
शेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत एल्गार...नगर : भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे...
शेतकरीप्रश्नी सरकारला गांभीर्य नाहीच :...पुणे  ः केंद्र आणि राज्य सरकार हेवत असून,...
शेतकऱ्यांना शहाणपणा शिकविण्याची गरज...पुणे : देशात आणि राज्यात शेतकरी तंत्रज्ञान...
एक जूनच्या संपात शेतकरी संघटना नाही :... पुणे ः देशात १ जून ते १० जूनदरम्यान पुकारण्यात...
तूर, हरभरा विक्रीचे पैसे न मिळाल्याने...नगर  : मागील दहा वर्षांतील पाच ते सहा वर्षे...
शेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचानागपूर  ः पाकिस्तान सीमेवर दररोज कुरापती...
संकटे असली तरी खचून न जाता पेरणी करणारपरभणी : औंदा मोसमी पाऊस वेळेवर यावा, समद्यांची...
राज्यात ढगाळ वातावरण; तर कोकणात पावसाची...भारतीय भूखंडावरील हवेचा दाब कमी होत आहेत. अरबी...
साताऱ्यात एक कोटी सात लाख क्विंटल साखर...सातारा : जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या...
चार जिल्ह्यांत हरभरा खरेदीला ग्रहणऔरंगाबाद : खरेदीत सातत्य नसणे, जागेचा प्रश्‍न आणि...
हंगाम तोंडावर; पीककर्जाची प्रतीक्षा...अकोला ः  खरीप हंगाम अवघा काही दिवसांवर आला...
पावसाच्या आगमनानुसार पीक नियोजनपावसाने ओढ दिल्याने पेरणीचे नियोजन चुकते. उपलब्ध...
ज्वारी उत्पादनवाढीची प्रमुख सूत्रेज्वारीची पेरणी जूनचा दुसरा आठवडा ते जुलैच्या...
पावसाने ओढ दिल्यास योग्य नियोजन करावेपुणे  ः यंदा पावसाचा चांगला अंदाज व्यक्त...
'यंदाच साल बरं राहिलं' या आशेवर खरिपाची...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी खरिपाच्या अंतिम...