agriculture news in marathi,farmers does not get subsidy for agricultural mechanization scheme, akola, maharashtra | Agrowon

अकोला जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरण योजनेचे अनुदान मिळेना
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 मे 2018
या वर्षी २५ जानेवारीला ६ लाख ४० हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर घेतला. मी अल्पभूधारक शेतकरी असून, ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतले अाहे. मार्च महिन्यापर्यंत अनुदान मिळणे अपेक्षित होते. पण अद्याप मिळालेले नाही. मला फायनान्सकडून कर्जाचा हप्ता भरण्यासाठी पत्र अाले अाहे. अनुदानाबाबत कृषी विभागाकडे चौकशी केली असता, येत्या अाठ-दहा दिवसांत ते मिळेल, असे सांगण्यात अाले.
- शरद रमेश इंगळे, अंबिकापूर, जि. अकोला
अकोला : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासनाने अाखलेल्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरणासाठी शासन अार्थिक पाठबळ देत आहे. परंतु या योजनेतून वेळेत अनुदान मिळत नसल्याने गेल्या वर्षातील लाभार्थी अार्थिक अडचणीत आले अाहेत. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून नव्याने अर्ज मागवण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर राबवली जात अाहे. पण जुने अनुदान दिले जात नसल्याची वस्तुस्थिती समोर अाली अाहे.
 
उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अंतर्गत शेतकऱ्यांना रोटाव्हेटर, मळणीयंत्र, ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पेरणी यंत्र, डाळमिल, कपाशी श्रेडर, कल्टिव्हेटर, पॉवर विडर, पाइप, पंप संच अशाप्रकारचे विविध यंत्रे घेता येतात. शेतकऱ्यांना त्याच्या गरजेनुसार हवे असलेले यंत्र घेण्यासाठी शासनाकडे अाॅनलाइन अर्ज दाखल करावा लागतो. सध्या अशा प्रकारचे अर्ज मागवण्यासाठी जनजागृती केली जात अाहे.
 
एकीकडे हे अर्ज मागवत असताना दुसरीकडे मागील वर्षातील अनुदानाबाबत मात्र जिल्ह्यातील यंत्रणा काहीही सांगायला तयार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अनुदानाबाबत विचारणा करण्यासाठी गेल्यास शेतकऱ्यांना शासनाकडूनच अनुदान मिळालेले नसल्याचे एकच उत्तर एेकायला मिळते. शिवाय ते अनुदान कधी येईल याची निश्चित माहितीसुद्दा अधिकारी देत नाहीत.
 
योजनेतून ट्रॅक्टरसारखे मोठे यंत्र घेतलेल्या शेतकऱ्यांना एक ते सव्वा लाखांपर्यंत अनुदान दिले जाणार अाहेत. मागील वर्षात सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांनी पाच महिन्यांपूर्वी ट्रॅक्टर खरेदी केले. यासाठी पैशांची जुळवाजुळव केली होती. अनुदान अाल्यानंतर पैशांची परतफेड करता येईल, या उद्देशाने व्यवहार केलेले शेतकरी सध्या अार्थिक अडचणीत सापडले अाहेत.   
 
अकोला जिल्ह्याचा विचार केला, तर सुमारे ६०० ट्रॅक्टर वाटप झालेले अाहेत. यासाठी सहा कोटी ८९ लाख रुपये अनुदानाची गरज अाहे. नवीन वर्षात या योजनेची नव्याने अंमलबजावणी सुरू झाली असताना अातापर्यंत मागील अनुदान जिल्ह्याला अालेले नाहीत. पर्यायाने शेतकऱ्यांनाही मिळू शकलेले नाही. हंगामापूर्वी तरी निदान हे अनुदान मिळावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत अाहेत.

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...