agriculture news in marathi,farmers give priority for millet crop, pune, maharashtra | Agrowon

उन्हाळी बाजरीकडे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल अधिक
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 एप्रिल 2018
पावसाळ्यात जास्त पाऊस होत असल्यामुळे किडी- रोगांमुळे बाजरी उत्पादनात घट येते. उन्हाळी हंगामात कीड - रोगांचा फारसा प्रादुर्भाव होत नाही, त्यामुळे अनेक शेतकरी उन्हाळी हंगामात बाजरीची पेरणी करतात. यंदा जुन्नर तालुक्‍यात बाजरी पेरणीचे क्षेत्र चांगले आहे.
- हिरामण शेवाळे, तालुका कृषी अधिकारी, जुन्नर, जि. पुणे.
पुणे  ः उन्हाळी हंगामात कीड - रोगांचा फारसा प्रादुर्भाव होत नसल्याने पुणे जिल्ह्यातील शेतकरी बाजरी पिकाकडे वळत आहेत. यंदाही शेतकऱ्यांचा उन्हाळी बाजरी पिकाकडे अधिक कल असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ४१७० हेक्‍टरवर उन्हाळी बाजरीची पेरणी केली आहे. या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्‍यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. 
 
पावसाळ्यात बाजरी पिकावर किडी- रोगांचा मोठा प्रादुर्भाव दिसून येतो. परिणामी उत्पादनात घट होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजरी पीक पावसाळ्यात घेण्याऐवजी उन्हाळ्यात घेण्यावर भर दिला आहे. याशिवाय चांगल्या दर्जाचा चाराही उन्हाळ्यात उपलब्ध होतो. त्यामुळे आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्‍यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजरीची पेरणी करत आहेत.
 
यंदा जुन्नर तालुक्‍यात सर्वाधिक लागवड बाजरीची झाली आहे. यात नारायणगाव, खोडद, बोरी, बेल्हे, हिवरेतर्फे, आळेफाटा, मांजरवाडी, वारूळवाडी, ओतूर, रोकडी, उंब्रज, डिंगोरे, आर्वी, कुरण, कांदळी, निमगाव सावा आदी गावांचा समावेश आहे. तालुक्‍यात बाजरीचे सरासरी क्षेत्र १४०० हेक्‍टर आहे. त्यापैकी २५६० हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
 
खेडमध्ये ८१० हेक्‍टरवर पेरणी झाली असून, वाफगाव, कळूस, दावडी, गुंडाळवाडी, बुरसेवाडी, सोयगाव अशा अनेक गावांत बाजरीची पेरणी झाली आहे. आंबेगाव तालुक्‍यात ७६० हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये निरगुडसर,  अवसरी, धामणी, कळंब, मंचर, पेठ आदी गावांचा समावेश आहे. 

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...