agriculture news in marathi,Farmers' struggle to save paddy fields | Agrowon

भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
टीम अॅग्रोवन
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

नगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी गणपतीत नक्की कोसळतो, यंदा दीड महिना आधीच पाऊस गायब झालाय. पाऊस नाही, त्यामुळं यंदा पंचवीस टक्केही भाताचे पीक आले नाही. जागेवरच करपलाय, १९७२ च्या दुष्काळानंतर पहिल्यांदाच असं झालं. जोरदार पाऊस पडणाऱ्या भागात यंदा मोठा दुष्काळ आहे.’ अकोले तालुक्‍याच्या आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी व्यथा मांडत यंदाची तीव्रता स्पष्ट केली. सध्या अकोले तालुक्‍यात भातपीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे दिसून आली.

नगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी गणपतीत नक्की कोसळतो, यंदा दीड महिना आधीच पाऊस गायब झालाय. पाऊस नाही, त्यामुळं यंदा पंचवीस टक्केही भाताचे पीक आले नाही. जागेवरच करपलाय, १९७२ च्या दुष्काळानंतर पहिल्यांदाच असं झालं. जोरदार पाऊस पडणाऱ्या भागात यंदा मोठा दुष्काळ आहे.’ अकोले तालुक्‍याच्या आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी व्यथा मांडत यंदाची तीव्रता स्पष्ट केली. सध्या अकोले तालुक्‍यात भातपीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे दिसून आली.

नगर जिल्ह्यामध्ये दरवर्षी अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात जोरदार पाऊस पडत असतो. यंदाही सुरवातीच्या काळात चांगला पाऊस झाला. भंडारदरा, निळवंडे भरले. प्रशासनाच्या लेखी यंदाही १२० टक्के अकोले तालुक्‍यात पाऊस झालेला आहे. अकोले तालुक्‍यातील पन्नासपेक्षा अधिक गावांसह शेजारच्या ठाणे, नाशिक, पुणे जिल्ह्यांमधील डोंगराळ, आदिवासी भागात भाताचे पीक घेतले जाते. जास्तीच्या पावसावरच अवलंबून असलेले हे पीक यंदा पूर्णतः धोक्‍यात आहेत. मुळात जोरदार पाऊस पडणाऱ्या भागात यंदा सुरवातीला चांगला पाऊस झाला असला तरी पोळ्यापासून म्हणजे साधारण दीड महिन्यापासून पाऊस अन्य भागाप्रमाणे याभागातूनही गायब झाला आहे.

सध्या भाताचे पीक शेवटच्या टप्प्यात आहे. मात्र, ऐन बहरात भातपीक असताना पाऊस नसल्याने पीक जागेवरच करपले आहे. सर्वाधिक पाऊस या भागात पडत असला आणि धरणे भरलेली असली तरी त्याचा भातशेतीला फायदा नाही. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे त्यांचा भातपीक वाचवण्याची धडपड सुरू आहे. मात्र, सध्या साधारण साठ टक्के पीक वाया गेले असल्याचे येथील शेतकरी सांगतात. हीच परिस्थिती शेजारच्या जिल्ह्यातील आहे. खरिपातील पिके वाया गेली, रब्बीतही या भागात पिके घेता येणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने राजूर, भंडारदरा, मुरशेत, धामणवन, पांजरे, घाटघर, रतनवाडी आदी भागातील नागरिकांनी मजुरीसाठी स्थलांतर सुरू केले आहे.

‘दसरा-दिवाळीपर्यंत आमच्या भागात जोरदार पाऊस पडत असतो. यंदा मात्र पोळ्यापासून पाऊस आला नाही. चाळीस वर्षांच्या काळात पहिल्यांदाच असे झाले आहे. पाऊस नसल्याने साठ टक्‍केपेक्षा जास्ती भातपीक वाया गेले आहे. जे आले त्याचा उतारही कमी मिळणार आहे. यंदाचा दुष्काळ आदिवासी जनतेला जगणं महाग करणारा आहे.’
- दगडू धिंदळे,
शेतकरी, धामणवन, ता. अकोले, जि. नगर

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...