agriculture news in marathi,Fasting at the Kalamb for the acquisition of the well | Agrowon

विहीर अधिग्रहणासाठी कळंब येथे उपोषण
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

खामसवाडी, जि. उस्मानाबाद : खामसवाडी गावासाठी मागणी प्रमाणे आठ विहिरींचे अधिग्रहण मंजूर न केल्यामुळे ग्रामपंचायतीचे सदस्य गुरुवारपासून (ता. ११) उपविभागीय कार्यालय कळंब येथे उपोषणाला बसले आहेत.

उपविभागीय अधिकारी कळंब यांना १ ऑक्‍टोबरला लेखी निवेदन देऊन दाखल प्रस्तावाप्रमाणे खामसवाडी गावासाठी आठ विहिरींचे अधिग्रहण मंजूर करण्याची मागणी केली होती.

खामसवाडी, जि. उस्मानाबाद : खामसवाडी गावासाठी मागणी प्रमाणे आठ विहिरींचे अधिग्रहण मंजूर न केल्यामुळे ग्रामपंचायतीचे सदस्य गुरुवारपासून (ता. ११) उपविभागीय कार्यालय कळंब येथे उपोषणाला बसले आहेत.

उपविभागीय अधिकारी कळंब यांना १ ऑक्‍टोबरला लेखी निवेदन देऊन दाखल प्रस्तावाप्रमाणे खामसवाडी गावासाठी आठ विहिरींचे अधिग्रहण मंजूर करण्याची मागणी केली होती.

अन्यथा ११ ऑक्‍टोबरपासून उपोषणाचा इशारा उपसरपंच प्रभाकर शेळके व अन्य सदस्यांनी दिला होता. प्रशासनाने मागणी व निवेदनाची दखल घेतली नाही. त्यामुळे गुरुवारपासून कळंब येथील उपविभागीय कार्यालयासमोर उपसरपंच प्रभाकर शेळके, अंगद देवकर, सचिन शेळके, सरपंच पती संजय कोळी उपोषणास बसले आहेत. खामसवाडी गावात यंदा पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत आहेत. जवळपास दहा हजार लोकसंख्येच्या या गावातील लोकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. ग्रामपंचायतने पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आठ विहिरींचे अधिग्रहण मंजूर करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला असल्याचे उपसरपंच शेळके यांनी सांगितले.

प्रशासनाने मात्र, त्यापैकी तीन विहिरींच्या अधिग्रहणाला मंजुरी दिली आहे. आठ विहिरींचे अधिग्रहण करून सोळा कूपनलिकाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन गाव पातळीवर ग्रामपंचायतीने केले आहे. प्रशासनाने यासाठी सहकार्य करण्याची गरज असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणने आहे. त्यामुळे उपोषणाचा मार्ग अवलंबला असल्याचे त्यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...
साडेचौदा टन केशर, बदामी आंबा...मुंबई : वातावरण नियंत्रित करून फळाचे...