agriculture news in marathi,Finally the green lantern of the market committee recruitment | Agrowon

सांगली बाजार समितीत नोकर भरतीला हिरवा कंदील
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 नोव्हेंबर 2017

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहा महिन्यांपासून चर्चेत असलेल्या नोकर भरतीला अखेर पणन संचालकांकडून हिरवा कंदील मिळाला आहे. बाजार समितीत १९ रिक्त जागा भरण्यास मंजुरी मिळाली आहे, तसेच ९ जागा पदोन्नतीने भरण्याबाबतचेही आदेश दिले आहेत. पणनच्या निर्णयाने भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. एका महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ यांनी दिली.

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहा महिन्यांपासून चर्चेत असलेल्या नोकर भरतीला अखेर पणन संचालकांकडून हिरवा कंदील मिळाला आहे. बाजार समितीत १९ रिक्त जागा भरण्यास मंजुरी मिळाली आहे, तसेच ९ जागा पदोन्नतीने भरण्याबाबतचेही आदेश दिले आहेत. पणनच्या निर्णयाने भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. एका महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ यांनी दिली.

श्री. शेजाळ म्हणाले, की कृषी उत्पन्न बाजार समितीचे मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्‍यात कार्यक्षेत्र आहे. बाजार समितीत हळद, बेदाण्याची बाजारपेठ असल्याने परराज्यातील मोठ्या शेतीमालाची आवक होते. तीन तालुक्‍यात दुय्यम आवारामध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. बाजार समितीला १३९ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या ११३ कार्यरत आहेत. २९ रिक्त पदे भरण्यासाठी याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने पणन मंडळाकडे तीन महिन्यांपूर्वी सादर करण्यात आला होता. पणन संचालकांनी १९ जागा भरण्यासाठी मंजुरी दिली आहे.

नोकरभरतीसाठी जाहिरात, रोजगार नोंदणी कार्यालयाकडून बेरोजगारांची यादी मागवली जाईल. दोन्हीच्या आधारे, शासकीय आरक्षणानुसार भरती केली जाईल. कर्मचारी भरतीसाठी नामावली बिंदूला यापूर्वी मान्यता घेतलेली आहे.

भरती पूर्णपणे गुणवत्तेवर, पारदर्शीपणे होईल. बाजार समितीच्या कारभारासाठी सध्याचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यातही आधुनिक तंत्रज्ञान अवगत असलेल्यांची संख्या कमी आहे. भविष्यात सध्याच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन आणखी १० कर्मचारी भरतीची परवानगी मागितली जाईल, असेही शेजाळ म्हणाले.

इतर बातम्या
महाबळेश्वरमध्ये हिमकणांची चादरमहाबळेश्वर, जि. सातारा  ः राज्यात सर्वत्र...
जलयुक्तमधील 'सुरूंग' कामाला पोलिस...पुणे : जलयुक्त शिवाराचा निधी गडप करण्यासाठी कृषी...
बोंडअळीग्रस्त, धान उत्पादकांना संयुक्त...मुंबई : राज्यात गुलाबी बोंडअळी आणि धान...
लाळ्या खुरकूत लस पुरवठा विलंबाच्‍या...पुणे  ः लाळ्या खुरकूत लसींच्या पुरवठ्याच्या...
कोरडे, उष्ण हवामान राहून तापमानाची...महाराष्ट्रासह दक्षिण, मध्य, उत्तर व ईशान्य...
नेदरलॅंडमध्ये साठवण, निर्यातीसाठी खास...वातावरणातील बदल लक्षात घेता कांदा पिकांच्या नव्या...
मंत्रालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा...मुंबई : धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील...
राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या...नगर : शेतमालाला दर मिळण्यासह अन्य...
‘एल निनो’चा यंदा माॅन्सूनला धोका नाहीपुणे ः प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ सप्टेंबर...
मागासवर्गीय तरुणांना उद्योगासाठी कर्जमुंबई  : मागासवर्गीय बेरोजगार तरुणांना...
चाऱ्याचा होतोय कोळसाअकोला ः अत्यल्प पाऊस, विदर्भ, मराठवाड्यातील कोरडे...
हमीभाव खरेदी केंद्रांवर हमालीच्या...अकोला : अाधारभूत किमतीने सुरू असलेल्या तूर...
मध्य महाराष्ट्र, काेकणात हलक्या पावसाचा...पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
भारत हवामान बदलाला सर्वांत संवेदनशीललंडन ः भारत हा जागातील सर्वांत जास्त हवामान...
‘अविश्वास’ला विश्वास ठरावाने उत्तरमुंबई : विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे...
सरकारने लोकशाहीचा खून केला : विरोधकांचा...मुंबई : विधानसभा अध्यक्षांविरोधात प्रस्ताव दाखल...
पुणे जिल्ह्यात होणार दोन हजार ९६ पीक... पुणे   ः रब्बी हंगामातील पिकांची...
पुणे जिल्ह्यात ११ हजार कांदा चाळींची...पुणे  ः कांद्याचे अधिक उत्पादन झाल्यास...
लोकपाल, हमीभावासाठी अण्णांचा रामलीलावर...नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत आश्वासन देऊनही मोदी...
तेवीस कारखान्यांकडून ७७ लाख ६३ हजार टन... औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...