नाशिकला पहिल्यांदाच मशिनद्वारे कांद्याची प्रतवारी

नाशिकला पहिल्यांदाच मशिनद्वारे कांद्याची प्रतवारी
नाशिकला पहिल्यांदाच मशिनद्वारे कांद्याची प्रतवारी

नाशिक : कांद्याची निर्यात करण्यासाठी कांदा कंटेनरद्वारे मुंबईकडे पाठविला जातो. कंटेनरमध्ये थंडावा असल्याने निर्यातक्षम कांद्यामध्ये आर्द्रता निर्माण होते. परिणामी, कांद्याला काळे डाग पडतात. त्याचा परिणाम थेट बाजारभावावर होतो. याला पर्याय म्हणून लासलगाव येथील कांदा निर्यातदार मनोज जैन यांनी कांदा प्रतवारी करण्याचे मशीन आणले असून, यात वेगवेगळ्या आकारातील कांदा प्रतवारी करून पत्ती, कचरा वेगळा केला जाणार आहे. नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच मशीनद्वारे कांद्याची प्रतवारी करण्याचा प्रयोग लासलगावी करण्यात आला आहे.

कांदा म्हटले की, आपोआप डोळ्यासमोर नाव येते ते लासलगावचे. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. सर्वात चांगला भाव लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांना दिला जातो, अशी भावना शेतकऱ्यांची आहे.

आज कांद्याच्या भावाची परिस्थिती पाहता शेतकरी समाधानी नाही. उत्पादन खर्च निघणार नाही, अशी स्थिती सध्या कांद्याच्या दराची आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला थोडाफार का होईना फायदा होईल, या हेतूने येथील कांदा निर्यातदार मनोज जैन यांनी तब्बल चौदा लाख रुपये खर्च करून कांदा प्रतवारी मशीन खरेदी केले आहे.

मध्य प्रदेश येथून हे मशीन बनवून घेण्यात आले असून, अडीच, साडेतीन, साडेचार, साडेपाच मिमी आकारात कांदा या मशीनमधून वेगळा करून तो गोण्यांमध्ये भरला जातो. या मशीनचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कांद्याचे जादा टरफल हे पूर्णपणे बाजूला केले जाते. त्यामुळे कांदा देशांतर्गत व निर्यातीसाठी योग्यरित्या पाठविण्यास मदत होते. कांदा प्रतवारी होत असताना कांद्याचे टरफल निघून जात असल्याने कांद्यास एकप्रकारे चकाकी निर्माण होते. त्यामुळे या कांद्याला चांगला भाव मिळू शकेल, असा दावा जैन यांनी केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com