agriculture news in marathi,Germination due to lack of moisture; Rabi drought situation | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत रब्बीवर दुष्काळी सावट
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे आजवर पेरणी केलेल्या ज्वारी, करडई, हरभरा आदी पिकांची उगवण व्यवस्थित होत नाही. कोरडवाहू जमिनीत ओलावा राहिला नसल्यामुळे पेरणी शक्य नाही. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी असल्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील रब्बी पिकांच्या क्षेत्रात घट होणार असून नापेर क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे. या तीन जिल्ह्यांतील रब्बीच्या क्षेत्रात ५० ते ६० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या ज्वारी, हरभऱ्याची पेरणी सुरू आहे. परंतु, कृषी विभागाकडे अद्याप पेरणी क्षेत्राची माहिती उपलब्ध झालेली नाही.

नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे आजवर पेरणी केलेल्या ज्वारी, करडई, हरभरा आदी पिकांची उगवण व्यवस्थित होत नाही. कोरडवाहू जमिनीत ओलावा राहिला नसल्यामुळे पेरणी शक्य नाही. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी असल्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील रब्बी पिकांच्या क्षेत्रात घट होणार असून नापेर क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे. या तीन जिल्ह्यांतील रब्बीच्या क्षेत्रात ५० ते ६० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या ज्वारी, हरभऱ्याची पेरणी सुरू आहे. परंतु, कृषी विभागाकडे अद्याप पेरणी क्षेत्राची माहिती उपलब्ध झालेली नाही.

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत आॅगस्ट -सप्टेंबर महिन्यात पडलेल्या दीर्घ खंडामुळे जमिनीतील उपलब्ध ओलावा कमी झाला आहे. अनेक प्रकल्पांच्या पाणीसाठ्यामध्ये पुरेशा प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. विहिरी, बोअरच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली नाही. सिंचनासाठी पुरेशा प्रमाणात पाणी मिळणार नाही. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात मोठी घट येणार आहे. काही भागात मूग, उडीद तसेच लवकर आलेल्या सोयाबीनच्या काढणीनंतर शेतकऱ्यांनी ज्वारी, हरभरा, करडईची पेरणी केली. परंतु ओल नसल्यामुळे उगवण कमी होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत रब्बीचे एकूण सरासरी क्षेत्र ५ लाख ३७ हजार ७२ हेक्टर आहे. यंदा या जिल्ह्यांत ६ लाख ७३ हजार ५५५ हेक्टवर पेरणी प्रस्तावित करण्यात आली होती. परंतु, कमी पावसामुळे प्रस्तावित पेरणी क्षेत्रात मोठी घट येणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर, मुखेड, बिलोली, नायगाव, किनवट, धर्माबाद, उमरी आदी तालुक्यांत रब्बीच्या क्षेत्रात मोठी घट येणार आहे. इसापूर धरणाच्या पाणी आवर्तनामुळे लाभक्षेत्रातील अर्धापूर, हदगांव, मुदखेड आदी तालुक्यांमध्ये तालुक्यात रब्बीचा पेरा वाढू शकतो. परंतु सर्वच सोळा तालुक्यांतील कोरडवाहू क्षेत्रातील पेरणी क्षेत्रात मात्र मोठी घट येणार आहे. या जिल्ह्यात खरिपापाठोपाठ रब्बी मोठे क्षेत्र नापेर राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

आमच्या भागात अत्यंत कमी पाऊस झाला. जमिनीत अजिबात ओलावा नाही. त्यामुळे यंदा हरभरा, भुईमूगाची पेरणी शक्य नाही.
- सदाशिव पाटील,
हाणेगांव, ता. देगलूर, जि. नांदेड.

मुगानंतर ज्वारी, करडई, हरभऱ्याची पेरणी केली. पण ओल नसल्यामुळे उगवण व्यवस्थित होत नाही.
- नरेश शिंदे, सनपुरी, जि. परभणी.

ज्वारी, हरभऱ्याची पेरणी केली. थंडी वाढल्यानंतर कमी पाण्यावर येणाऱ्या गव्हाची पेरणी करायची आहे.
- सुभाष डुकरे,
विरेगांव, ता. वसमत, जि. हिंगोली.

इतर अॅग्रो विशेष
कोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...
जपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...
कुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे  ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...
दुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई   ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...