agriculture news in marathi,Government cereals purchase after 10 oct. | Agrowon

जळगावात शासकीय कडधान्य खरेदी १० आॅक्टोबरनंतर
टीम अॅग्रोवन
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

खरेदीसंबंधीची तारीख शासनाकडून आल्यानंतर त्याबाबत माहिती दिली जाईल. खरेदीची तयारी तिन्ही केंद्रांवर पूर्ण झाली आहे. नोंदणीलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
                                   - परिमल साळुंखे, पणन   अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन, जळगाव

जळगाव : शासकीय कडधान्य खरेदीला पुढील आठवड्यात १० तारखेनंतर सुरवात होण्याची शक्‍यता आहे. नोंदणी सध्या सुरू असून, तिला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तीन्ही केंद्रांवर सुमारे अडीच हजार शेतकऱ्यांनी नोंदणी अर्ज दिले आहेत. यंदा खरेदीला चांगला प्रतिसाद मिळेल, हे लक्षात घेऊन गोदामे, बारदाना व इतर यंत्रणेसंबंधी आढावा घेण्यात आला आहे. कुठलीही अडचण यंदा खरेदीदरम्यान भासणार नाही, याची दक्षता घेतल्याचे सांगण्यात आले.

कडधान्यात मूग व उडदाची खरेदी जिल्ह्यातील जळगाव, पाचोरा व अमळनेर येथे केली जाईल. या केंद्रांवर जिल्ह्यातील कुठल्याही भागातील शेतकरी आपले धान्य विकू शकतात. मुगाला ६९७५, उडदाला ५६०० रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव असेल. सध्या खासगी बाजारात किंवा बाजार समितीत मूग व उडदाला ५ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंतच दर आहेत. शासकीय खरेदीसंबधी शेतकऱ्यांना नोंदणी बंधनकारक केली आहे. येत्या ९ तारखेपर्यंत ही नोंदणी सुरू राहील. त्यानंतर खरेदी सुरू होईल.

नोंदणीनंतर संबंधित शेतकऱ्याला मोबाईलवर संदेश जात आहे. हा संदेश मिळाल्याशिवाय नोंदणी झाली, हे गृहीत धरले जात नाही.

खरेदीच्या वेळेसही नोंदणीकृत शेतकऱ्याला संदेश जाईल. त्याशिवाय खरेदी केंद्रात धान्य विक्रीसाठी आणता येणार नाही, असे मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांनी सांगितले. जळगाव येथे विसनजीनगरातील कृषी औद्योगिक सहकारी संस्थेत सुमारे ११०० शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत. पाचोरा येथील केंद्र बाजार समितीत असून, येथे सुमारे ८०० शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत. अमळनेरातही जवळपास ६०० अर्ज आल्याची माहिती मिळाली.

इतर बातम्या
साखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...
रताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...
दुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन...पुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात...
खरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव  : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...
मराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...
सांगली जिल्ह्यात १४ हजार शेतकरी वीज...सांगली : जिल्ह्यातील १४ हजारांहून अधिक शेतकरी वीज...
तुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...
टँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...
अकोला जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना...अकोला : दुष्काळमुक्त जिल्हा करण्यासाठी जिल्ह्यात...
दिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...
सातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...
नाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...
रब्बीची ज्वारीची एक लाख हेक्टरवर पेरणीसातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामात अन्नधान्यासह...
मोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...
खोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...
पूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...
उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...
गेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...