agriculture news in marathi,government issues order to nursuries to stop the use of polithin bags,pune, maharashtra | Agrowon

पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे रोपवाटिकांना आदेश
टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील रोपवाटिकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पॉलिथिन पिशव्यांचा वापर तत्काळ थांबविण्याचे आदेश केंद्र शासनाने दिलेले आहेत.

कृषी विभागाच्या रोपवाटिका तसेच खासगी रोपवाटिकांमध्येदेखील पॉलिथिन पिशव्यांचा वापर होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. केंद्रीय वन विभागाचे उपमहासंचालक रोहित तिवारी यांनी जारी केलेल्या एका आदेशानुसार (क्रमांक १७१९-२०१८) राज्यात वन खात्याच्या सर्व रोपवाटिका पॉलिथिन पिशवीमुक्त कराव्या लागणार आहेत.

पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील रोपवाटिकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पॉलिथिन पिशव्यांचा वापर तत्काळ थांबविण्याचे आदेश केंद्र शासनाने दिलेले आहेत.

कृषी विभागाच्या रोपवाटिका तसेच खासगी रोपवाटिकांमध्येदेखील पॉलिथिन पिशव्यांचा वापर होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. केंद्रीय वन विभागाचे उपमहासंचालक रोहित तिवारी यांनी जारी केलेल्या एका आदेशानुसार (क्रमांक १७१९-२०१८) राज्यात वन खात्याच्या सर्व रोपवाटिका पॉलिथिन पिशवीमुक्त कराव्या लागणार आहेत.

केंद्र शासनाने २०२२ पर्यंत देशात पुनर्वापर होणाऱ्या प्लॅस्टिकचा पूर्णतः वापर करण्याचे धोरण ठरविले आहे. तथापि कृषी व वन खात्याच्या रोपवाटिकांमध्येच पॉलिथिनचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आता रोपे तयार करण्यासाठी पर्याय शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील प्लॅस्टिक कंपन्यांना नोटिसा बजावल्यामुळे कंपन्यांना येत्या १५ डिसेंबरपासून बंद पुकारण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. प्लॅस्टिक कंपन्यांनी बंद पुकारल्यास राज्यात दूध डेअरी, दूध संघ तसेच खाद्यान्नाचे सर्व पुरवठादार अडचणीत येतील. त्यामुळे काही उत्पादनांची टंचाईदेखील तयार होऊ शकते, असे दूध उद्योगातून सांगण्यात आले.

कायद्यानुसार आता प्लॅस्टिक पुनर्संकलनाची जबाबदारी प्लॅस्टिक उत्पादक कंपन्यांकडे आली आहे. मंडळाच्या म्हणण्यानुसार या कंपन्या जबाबदारी टाळत असल्याने पुढील कारवाई करावी लागणार आहे. राज्यात प्लॅस्टिक उत्पादनात २५० कंपन्या असून त्यातील काही प्रमुख कंपन्या दूध व खाद्यान्न उद्योगाला पुरवठा करतात. दूध संघ, दूध विक्रेते किंवा प्लॅस्टिक उत्पादक कंपन्यांनादेखील प्लॅस्टिकच्या पिशव्या गोळा करता येणार नाहीत. सरकारनेच याबाबत तोडगा काढावा, अशी मागणी दूध डेअरी उद्योगातून केली जात आहे.

इतर अॅग्रो विशेष
वृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...
एकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...
राज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...
रोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...
देशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...
संत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...
होय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...
पीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...
विदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...
गाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
कपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...शेतकरी मोर्चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत...
जिवापाड जपलेल्या बागा आता जगवाव्यात कशा?नगर ः पाणी उपलब्ध नसल्याने फळबागा अडचणीत आल्या...
भातपीक करते शेतातून वाहणाऱ्या पाण्याचे...सध्या पाण्याच्या प्रवाहातून येणाऱ्या घटकांमुळे...
'फरदड'मुक्तीसाठी राज्यात २१ हजार...पुणे : राज्यात कपाशीचे उत्पादन घेणाऱ्या २१ हजार...
बोगस मिश्रखत विक्री प्रकरणी कंपनीमालक,...पुणे : शेतकऱ्यांना बोगस मिश्रखताचा पुरवठा...
शेडनेट, पॉलिहाउससाठी एक एकरापर्यंत...पुणे : हरितगृह, पॉलिहाउसला मागणी वाढत असल्याने...
दुष्काळ सहनशील १८ ऊस वाणांची चाचणीनवी दिल्ली ः महाराष्ट्रासाठी कमी पाण्यावर...
कर्जमाफीचे सतरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विदर्भात पावसाचा अंदाजपुणे: मध्य महाराष्ट्रात असलेल्या द्रोणीय...
सोलापूरच्या शेतकऱ्याची सांगलीत...सांगली : डाळिंब घ्या... डाळिंब, शंभर रुपयाला चार...