खरिपासाठी महाबीजच्या सोयाबीन बियाण्याला अनुदान जाहीर

खरिपासाठी महाबीजच्या सोयाबीन बियाण्याला अनुदान जाहीर
खरिपासाठी महाबीजच्या सोयाबीन बियाण्याला अनुदान जाहीर

अकोला ः या हंगामासाठी महाबीजचे सोयाबीन व इतर बियाणे  ग्राम बीजोत्पादन योजना तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आहे. प्रामुख्याने सोयाबीनचे बियाणे अनुदानावर मिळणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होईल.  या हंगामात कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ग्राम बीजोत्पादन योजनेअंतर्गत जेएस ९३०५ व एमएयूएस ७१ या वाणाचे ९९ हजार ३२५ क्विंटल आणि जेएस ३३५ या वाणाचे ८३ हजार १७५ क्विंटल बियाण्याला शासनाचे क्विंटलला १५०० रुपये अनुदान जाहीर झाले आहे. सध्या सोयाबीनच्या ३० किलो वजनाच्या एका बॅगची किमत १६८० रुपये असून अनुदानावर १३८० रुपयांना ही बॅग मिळेल, अशी माहिती मुख्य विपणन व्यवस्थापक प्रकाश ताटर यांनी दिली. महाबीजने या हंगामासाठी सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, धान व इतर बियाणे मिळून सुमारे आठ लाख क्विंटलपेक्षा अधिक  बियाणे नियोजन केले होते. यात प्रामुख्याने सोयाबीनचे सहा लाख ९६ हजार क्विंटल बियाणे आहे. या बियाण्यांपैकी पावणे दोन लाख क्विंटलपेक्षा अधिक बियाणे ग्राम बीजोत्पादन व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानअंतर्गत गळीतधान्य तेलताड अभियानातून अनुदानावर दिले जाणार आहे. ग्रामबीजोत्पादन अभियानात ९९३२५ क्विंटल बियाण्याला प्रतिक्विंटल १५०० रुपये अनुदान जाहीर झाले. हे बियाणे परमिटवर वाटप केले जाईल. एक एकरासाठी प्रत्येक शेतकऱ्याला बियाणे मिळू शकेल. तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत गळीतधान्य तेलताड अभियानातून १५ वर्षांच्या आतील प्रमाणित बियाणे वाणास २५०० प्रतिक्विंटल अनुदान जाहीर केले आहे. प्रात्यक्षिक योजनेचे बियाणे कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत वाटप केले जाईल. यासाठी कृषी विभागाकडून परमिट वितरित केले जातील. धानालाही अनुदान ग्रामबीजोत्पादन योजनेतून धानाच्या प्रमाणीत असलेल्या सुवर्णा, एमटीयू १०१०,  एमटीयु १००१, आयआर ६४ , पीकेव्ही एचएमटी, जेजीएल १७९८ या वाणांच्या बियाण्यांस १२०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान मिळेल.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com