मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटली

मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटली
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटली

औरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे यंदाच्या अल्प प्रमाणात पेरणी झालेल्या रब्बी पिकांची वाढ खुंटली आहे. दुसरीकडे ढगांमुळे हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. भाजीपालावर्गीय पिकांवरही थ्रीप्सचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादन व उत्पन्न घटण्याची शाश्‍वती जास्त असलेल्या खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १८ लाख ८६ हजार ५४० हेक्‍टर आहे. यंदा केवळ १० लाख ५२ हजार ६९७ हेक्‍टरवरच रब्बीची पेरणी झाली. त्यामध्ये तृणधान्याची ५ लाख ५५ हजार ५८२ हेक्‍टरवर पेरणी झाली. त्यामध्ये रब्बी ज्वारी ३ लाख ९८ हजार २५४ हेक्‍टर, गहू १ लाख २४ हजार ९४२ हेक्‍टर, मका २३ हजार ९० हेक्‍टरवर पेरली गेली.

कडधान्याचे मराठवाड्यात सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख १६ हजार ३८९ हेक्‍टर इतके आहे. त्या तुलनेत ४ लाख ७५ हजार २१९ हेक्‍टरवर कडधान्याची पेरणी झाली. त्यामध्ये ४ लाख ३७ हजार ९५७ हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली. गळीतधान्याची २१ हजार ८९६ हेक्‍टरवर पेरणी झाली. त्यामध्ये ११८ हेक्‍टरवरील तीळ, १६ हजार २२७ हेक्‍टरवरील करडई, ९९९ हेक्‍टरवरील जवस, १६०२ हेक्‍टरवरील सुर्यफूल व २९५० हेक्‍टरवरील इतर गळीतधान्यांचा समावेश आहे.

आधीच जवळपास निम्म्या क्षेत्रावर पेरणी झालेल्या रब्बी पिकांची वाढ पावसाचा ताण व तापमानातील चढउताराणे प्रभावित झाली. थंड, ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. समाधानकारक शाखीय वाढ झालेला हरभरा दिसेनासच झाला आहे. भाजीपाल्यात खासकरून मोठ्या प्रमाणात लागवड होणाऱ्या कांद्यावर, तसेच टोमॅटो व वांग्यांवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. पांढरी माशीचाही प्रादुर्भाव बहूतांश भागात दिसून येतो आहे. संकटांच्या मालिकांमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक नफा घटण्याची दाट शक्यता आहे.

अशी आहे पीकनिहाय स्थिती

  • हरभरा पिकांची फुले व घाटे पक्‍वतेच्या अवस्थेत
  •  जालना जिल्ह्यात काही ठिकाणी हरभरा काढणीच्या अवस्थेत
  • बीड जिल्ह्यात हरभऱ्याच्या जिरायत पिकाची स्थिती असमाधानकारक
  • गहू पीक फुटवे फुटण्याच्या ते ओंबी लागण्याच्या अवस्थेत
  • मका वाढीच्या, निसवणीच्या अवस्थेत
  • ज्वारी पीक हुरडा अवस्थेत
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com