agriculture news in marathi,gujrat refuses water of tapi basin, maharashtra | Agrowon

तापीच्या पाण्यास गुजरातचा नकार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 जून 2018

मुंबई  ः पार-तापी नर्मदा नद्याजोड प्रकल्पातील महाराष्ट्राच्या वाट्याचे तापी खोऱ्यातील ४३४ दशलक्ष घनमीटर इतके पाणी देण्यास गुजरात सरकारने स्पष्ट नकार दिला आहे. राज्याच्या हक्‍काचे पाणी गुजरातने द्यावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवून विनंती केली होती. या विनंती पत्राला गुजरात सरकारने केराची टोपली दाखवली आहे. यामुळे महाराष्ट्र- गुजरात पाणीवाटप संघर्ष यापुढील काळात आणखी टोकाला पोचणार असल्याचे चित्र निर्माण झाले असून, विरोधकांच्या टीकेचे धनी सत्ताधारी भाजपला व्हावे लागणार असल्याची चिन्हे आहेत.

मुंबई  ः पार-तापी नर्मदा नद्याजोड प्रकल्पातील महाराष्ट्राच्या वाट्याचे तापी खोऱ्यातील ४३४ दशलक्ष घनमीटर इतके पाणी देण्यास गुजरात सरकारने स्पष्ट नकार दिला आहे. राज्याच्या हक्‍काचे पाणी गुजरातने द्यावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवून विनंती केली होती. या विनंती पत्राला गुजरात सरकारने केराची टोपली दाखवली आहे. यामुळे महाराष्ट्र- गुजरात पाणीवाटप संघर्ष यापुढील काळात आणखी टोकाला पोचणार असल्याचे चित्र निर्माण झाले असून, विरोधकांच्या टीकेचे धनी सत्ताधारी भाजपला व्हावे लागणार असल्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि गोवा या पाच राज्यांची बैठक मुंबईत १८ जुलै २०१८ रोजी मुंबईत बांद्रा येथे झाली. या बैठकीला केंद्रीय जलसंधारण, नद्या विकास राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल उपस्थित होते. या बैठकीत पार-तापी नर्मदा आणि दमनगंगा -पिंजाळ या आंतरराज्य नद्याजोड प्रकल्पाचा केंद्र सरकार आणि महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमध्ये सामंजस्य करार (एमओयू) होणार होता. मात्र राज्याच्या वाट्याच्या पाण्याबाबत गुजरातच्या प्रतिनिधींनी ठाम भूमिका घेत यास नकार दिल्याने हा करार होऊ शकला नसल्याचे सूत्रांकडून समजते.

यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० जुलै २०१७ रोजी पत्र पाठवून ४३४ दलघमी पाणी राज्याला द्यावे, अशी विनंती गुजरात राज्याला केली होती. मात्र त्यास गुजरात सरकारने स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. त्यानंतर २० एप्रिल २०१८ रोजी दोन्ही राज्यांची याबाबत दिल्ली येथे बैठक झाली होती या बैठकीत देखील गुजरात सरकारने ठाम भूमिका घेतल्याने चर्चेशिवाय गाडे पुढे सरकले नाही. त्यामुळे भविष्यात या दोन्ही राज्यांतील संघर्ष टोकाला जाणार असल्याची चिन्हे आहेत.

 

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...
गोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया   ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...
साताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा  : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...
नगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर  ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...
वाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम  ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...
खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा  : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...