agriculture news in marathi,harvestin of rabbi crops due to cloudy weather, satara, maharashtra | Agrowon

ढगाळ हवामानामुळे साताऱ्यात रब्बी पिकांच्या काढणीला वेग
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 मार्च 2018
सातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान असल्याने हाती आलेली पिके काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. हरभरा काढणी अंतिम टप्प्यात आली असून, गहू व रब्बी ज्वारी काढणी, मळणीच्या कामास वेग आला आहे. 
 
सातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान असल्याने हाती आलेली पिके काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. हरभरा काढणी अंतिम टप्प्यात आली असून, गहू व रब्बी ज्वारी काढणी, मळणीच्या कामास वेग आला आहे. 
 
जिल्ह्यात परतीचा पाऊस दमदार झाल्याने रब्बी हंगामात पोषक वातावरण होते. सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा या हंगामात जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पेरणी रब्बी ज्वारीची आहे. पोषक वातावरण तसेच पाणीटंचाई फारशी न जाणवल्याने रब्बीतील बहुतांशी पिकांची वाढ चांगली झाली होती. पहिल्या टप्प्यात पेरणी झालेली पिकांच्या काढणीची कामे उरकली आहेत.
 
सध्या दुसऱ्या टप्प्यातील काढणीची कामे सुरू झालेली आहे. यामध्ये प्रामुख्याने रब्बी ज्वारी व गहू पिकांचा समावेश आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र ढगाळ हवामान आहे. पाऊस झाल्यास रब्बीतील प्रमुख पिकांचे नुकसान होणार आहे. यामुळे काढणीला आलेली पिके तसेच थोडे दिवस कालवधी बाकी असणारी पिके काढण्यास वेग आला आहे.
 
सध्या मोठ्या प्रमाणात रब्बी ज्वारी व गहू पिकांच्या काढणी व मळणीच्या कामांना गती आली आहे. काही ठिकाणी गहू काढणी व मळणीसाठी हार्वेस्टरचा वापर केला जात आहे. पाऊस आल्यास ज्वारी व कडब्याचे नुकसान होण्याच्या भीतीने कणसाची वरूनच खुडणीही केली जात आहे. ढगाळ हवामानामुळे आंबा मोहर गळण्याचा धोका आहे. 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...