खरिपासाठी धुळे जिल्ह्यात खतपुरवठा सुरू

खरिपासाठी धुळे जिल्ह्यात खतपुरवठा सुरू
खरिपासाठी धुळे जिल्ह्यात खतपुरवठा सुरू

धुळे : खरीप हंगामाची तयारी सुरू असून, जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरवठा सुरू आहे. २०१९-२० या वर्षासाठी १ लाख १३ हजार ८०० मेट्रिक टन आवंटन मंजूर झाले असून, मागील वर्षाचा २९ हजार ८५२ मेट्रिक टन साठा शिल्लक आहे. असा एकूण १ लाख ४३ हजार ७७२ मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध होणार असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.  गेल्या वर्षापेक्षा या वर्षी ३२ हजार २०० मेट्रिक टन खते अधिक मिळणार असून, एप्रिल व मे महिन्यात मिळून सुमारे ३० हजार मेट्रिक टन खतांचा पुरवठा झाल्याची माहिती मिळाली.  २०१९-२० या वर्षासाठी खरिपाची २ लाख ८९ हजार हेक्‍टर क्षेत्रावर लागवड प्रस्तावित आहे. त्यापैकी २ लाख ३२ हजार ७०० हेक्‍टरवर कापूस लागवडीचे नियोजन आहे. खरीप हंगामा सुरू होण्यास अजून काही कालावधी बाकी असला तरी ऐन हंगामात खतांची टंचाई नको म्हणून कृषी विभागातर्फे खतांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार खतांच्या आवंटनाची मागणी करण्यात करण्यात येत असते.  २०१९-२० या वर्षासाठी १ लाख १३ हजार ९०० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर झालेले आहे. यात युरिया ५१ हजार मेट्रिक टन, डी.ए.पी. ३८००, एसएस.पी. १६ हजार ८००, एम.ओपी ६८००, मिश्र खते ३५ हजार ५०० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर झालेले आहे. गेल्या वर्षाचा २९ हजार ८५२ मेट्रिक टन खतांचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी १लाख ४३ हजार ७५२ मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध होणार आहे. २०१८-१९ मध्ये १ लाख २ हजार ७१० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर झाले होते. त्याचबरोबर ८ हजार ८४२ मेट्रिक टन खत शिल्लक होता. त्यामुळे १८-१९ या हंगामासाठी तब्बल १ लाख ११ हजार ५५२ मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर झाले होते. या वर्षी मंजूर आवंटनापेक्षा ११ हजार १९० मेट्रिक टन खतांचे आवंटन जास्त मंजूर झालेले आहे. 

तपासणीची शेतकऱ्यांची मागणी खतांचा काळाबाजार होणार नाही, यासाठी कृषी विभागाने भरारी पथकांमार्फत कृषी केंद्राची तपासणी करण्यात यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केलेली आहे. खतांची टंचाई भासू दिली जाणार नाही, असा दावा कृषी विभागाने केलेला आहे.  तालुकानिहाय खतपुरवठा दृष्टिक्षेपात

खताचा प्रकार    धुळे साक्री शिंदखेडा शिरपूर एकूण 
युरिया १३,२६० १५,८१० ११,७३० १०,२०० ५१,००० 
डी.ए.पी. ९८८ ११७८ ७८४ ७६० ३८००
एस.एस.पी. ४३६८ ५२०८ ३८६४ ३३६० १६,८००
एस.ओ.पी. १७६८ २१०८ १५६४ १३६० ६८००
मिश्र खते ९२३० ११,००५ ८१६५ ७१०० ३५,५००
एकूण २९,६१४ ३४,१७० २७,३३६ २२,७८० १,१३,९००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com