agriculture news in marathi,inauguration of marathi sahitya sammelan, yavatmal, maharashtra | Agrowon

आमच्या जितेपणाचा विचार का नाही : शेतकरी वैशाली येडे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 जानेवारी 2019

यवतमाळ  ः मर्द शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी हादरलेले सारे, पण आम्हा महिलांच्या जगण्यातला मर्दानी संघर्ष का दिसत नाही? आमच्या वाट्याला आलेले हे पांढरे कपाळ निसर्गाच्या नियमाने आलेले नाही. नैसर्गिकही नाही हे आमचे दुःख! व्यवस्थेने आमच्या नवऱ्याचा बळी घेतला आहे. तो तर मेलाच, आमच्या जितेपणाचा कोणीच विचार करीत नाही, या शब्दांत शेतकरी वैशाली येडे यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या. 

यवतमाळ  ः मर्द शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी हादरलेले सारे, पण आम्हा महिलांच्या जगण्यातला मर्दानी संघर्ष का दिसत नाही? आमच्या वाट्याला आलेले हे पांढरे कपाळ निसर्गाच्या नियमाने आलेले नाही. नैसर्गिकही नाही हे आमचे दुःख! व्यवस्थेने आमच्या नवऱ्याचा बळी घेतला आहे. तो तर मेलाच, आमच्या जितेपणाचा कोणीच विचार करीत नाही, या शब्दांत शेतकरी वैशाली येडे यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या. 

९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‍घाटन शुक्रवारी (ता. ११) झाले. या वेळी उद्‍घाटक म्हणून वैशाली येडे बोलत होत्या. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, ऊर्जा राज्यमंत्री तसेच पालकमंत्री मदन येरावार, संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, पूर्वाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख या वेळी उपस्थित होते. अत्यंत भावनिक आणि आक्रमक अशा शैलीत वैशाली येडे यांनी भाषण करीत शेतकरी विधवांची व्यथा आणि त्यांच्या जगण्याचा संघर्ष मांडला. 

पुरुष जगतो तर त्याचा तो मर्दानी संघर्ष. मग नवरा गेल्यानंतर आम्हा बायकांच्या जगण्याचा मर्दानी संघर्ष त्यांना का दिसला नाही, किंवा दिसत नाही? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. त्या म्हणाल्या, की वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत मी वैशाली धोटे होती. लग्नानंतर मी वैशाली सुधाकर येडे झाली. हेच नाव सुधाकर वैशाली धोटे असे झाले असते तर? पुरुषप्रधान व्यवस्थेला कदाचित ते सहन झाले नसते. 

पुरुषांचे दुःख मांडले जाते. परंतु नवऱ्याच्या मृत्यूनंतर आपला संसार सांभाळणाऱ्या मर्दानी महिलांचा संघर्ष का कोणी बघत नाही? अभावाने जगणाऱ्यालेच भाव भेटावं अशी चर्चा या संमेलनात व्हावी, अशी अपेक्षाही वैशाली येडे यांनी व्यक्‍त केली.

कास्तकाराचा संघर्ष अनेक लेखक, कवींनी जगासमोर मांडला; पण लेखक आणि कास्तकार सरकारच्या लेखी दोन्ही सारखेच. दोघांनाही सरकार दरबारी भावच मिळत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्‍त केली.

साहित्य संमेलनात नयनतारा सहगल यांचे मुखवटे
सहित्य संमेलनाचे उद्‍घाटन नयनतारा सहगल यांच्या हस्ते होणार होते. परंतु ऐनवेळी विरोधामुळे त्यांना नकार कळविण्यात आला. परंतु उद्‍घाटनस्थळी त्यांचे मुखवटे घातलेल्या महिला आल्या होत्या. या कारणामुळे गोंधळ वाढल्याने पोलिसांनी ते मुखवटे जप्त केले. 

इतर अॅग्रो विशेष
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...