agriculture news in marathi,Kharif insurance premiums are filled elsewhere; Farmers are deprived of compensation | Agrowon

खरीप विम्याचे हप्ते इतरत्र भरले; शेतकरी भरपाईपासून वंचित
टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 जुलै 2018

धुळे : जिल्ह्यात मागील हंगामातील खरिपातील पिकांसंबंधीच्या विम्याचे शेतकऱ्यांकडून घेतलेले हप्ते निर्देशित विमा कंपनीकडे न जमा करता ते इतरत्र भरल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी मागील खरीप पीकविमा योजनेच्या भरपाईपासून वंचित राहिले आहेत. 

धुळे : जिल्ह्यात मागील हंगामातील खरिपातील पिकांसंबंधीच्या विम्याचे शेतकऱ्यांकडून घेतलेले हप्ते निर्देशित विमा कंपनीकडे न जमा करता ते इतरत्र भरल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी मागील खरीप पीकविमा योजनेच्या भरपाईपासून वंचित राहिले आहेत. 

अनेक गावांमध्ये हा प्रकार घडला असून, यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. बॅंकांच्या चकरा त्यांना सतत माराव्या लागत आहेत. 2017-18 च्या खरिपात नियमीत कर्जदारांकडून बॅंकांनी पंतप्रधान पीकविमा योजनेतून विमा हप्ता घेतला होता. ज्वारी, कडधान्ये, गळीत धान्य, कापूस आदींसाठी विमा हप्ता शेतकऱ्यांकडून घेतला. परंतु जो विमा हप्ता कापण्यात आला. त्यातील मोठी रक्कम दुसऱ्या संस्थेच्या खात्यावर जमा केली. विमा कंपनीकडे संबंधित रक्कम पोचलीच नाही. धुळे तालुक्‍यातील नेर येथील सेंट्रल बॅंकेच्या शाखेत हा प्रकार घडल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दुष्काळी स्थितीमुळे नेर व परिसरातील शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून भरपाई प्राप्त व्हायला हवी. या संदर्भात शेतकऱ्यांनी बॅंकेत विचारणा केली असता त्यांना विमा हप्ता विमा कंपनीकडे प्राप्त झालेला नसल्याचे लक्षात आले. या प्रकरणी शेतकऱ्यांनी बॅंक व्यवस्थापकांना घेराव घातला. नंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आणून दिला. 

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी संबंधित बॅंकेचे तत्कालीन व्यवस्थापक व इतर अधिकाऱ्यांना बोलावून झालेल्या प्रकाराची माहिती घेतली. या संदर्भात विमा कंपनी, सेंट्रल बॅंकेचे वरिष्ठ यांनी मिळून मार्ग काढावा. त्यांना जिल्हाधिकारी यांना याबाबतची माहिती द्यावी, असा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत झाला. यासंदर्भात बॅंकेतील संबंधित अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असून, याबाबत योग्य ती मदत बॅंकेला मिळावी. शेतकऱ्यांनी बॅंक अधिकाऱ्यांना बंदी बनविल्याचा आरोप या अधिकाऱ्यांनी केला आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...