तीन जिल्ह्यांत एक लाख २० हजार हेक्टरवर खरीप पेरणी

खरीप पेरणी
खरीप पेरणी

 नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सोमवारपर्यंत (ता.१८)  एकूण १ लाख २० हजार ३६० हेक्टरवर खरीप पेरणी झाली आहे. पेरणीनंतर लागलीच पावसाचा खंड पडल्यामुळे पिकांची विरळ उगवण झाली आहे. पाण्याचा ताण बसत असेलली पिके उन्हामुळे सुकून जात आहेत. पावसाच्या खंडामुळे पेरणीमध्येसुद्धा खंड पडला आहे.

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील बहुतांश तालुक्यात जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीस सुरवात केली. कापूस लागवडीला प्राधान्य देण्यात आले. मूग, उडीद या कमी कालावधीत येणाऱ्या तसेच सोयाबीन, ज्वारी, मका, तूर आदी पिकांची पेरणी करण्यात आली.

नांदेड जिल्ह्यात ४८ हजार ९८९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये सोयाबीनची ७ हजार ५४१, कापसाची ३१ हजार १९२, मुगाची ९१८, उडिदाची ७६५, तुरीची ७ हजार ८१७, ज्वारीची ६३८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. परभणी जिल्ह्यात ३६ हजार १९८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये २५ हजार ७८९ हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली आहे. ७ हजार २२ हेक्टरवर सोयाबीन, १ हजार १४८ हेक्टरवर तूर, ८५३ हेक्टर मूग, १८३ हेक्टरवर उडीद, १ हजार १५६ हेक्टरवर ज्वारी या प्रमुख पिकांचा समावेश आहे.

हिंगोली जिल्ह्यात ५ हजार हेक्टरवर कापूस लागवड, १० हजार हेक्टरवर सोयाबीन तसेच ५ ते ६ हजार हेक्टरवर मूग, उडिद, तूर तसेच १० हजार हेक्टरवर हळद लागवड झाली आहे. पेरणीनंतर लागलीच पावसाचा खंड पडला आहे. गेल्या आठवडाभरात काही ठिकाणी झालेला तुरळक पाऊस वगळता बहुतांश भागात पावसाने दडी मारलेली आहे. त्यामुळे पेरणी खोळंबली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com