agriculture news in marathi,kharip planning, hingoli, maharashtra | Agrowon

हिंगोलीमध्ये खरिपात कपाशीच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 एप्रिल 2018
कपाशीच्या क्षेत्रात २० टक्के घट होण्याचा अंदाज आहे सोयाबीन, तुरीचे क्षेत्र वाढणार आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध करून दिले जाईल.
- विजय लोखंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ३ लाख ५६ हजार ३९५ हेक्टरवर विविध पिकांची पेरणी प्रस्तावित आहे. यंदा कपाशीच्या क्षेत्रात २० टक्के घट तर सोयाबीन, तुरीच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध व्हावेत, यासाठी विविध पिकांच्या १ लाख १० हजार ८७४ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
हिंगोली जिल्ह्यात गतवर्षी खरीप हंगामात ३ लाख ५७ हजार ६३५ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा ३ लाख ५६ हजार ३९५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल असे गृहीत धरण्यात आले आहे. गुलाबी बोंड अळीमुळे नुकसान झाल्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा कापूस लागवड क्षेत्रात ११ हजार २२ हेक्टरने घट होऊन ४३ हजार ६८४ हेक्टरवर लागवड होईल असे गृहीत धरण्यात आले आहे.
 
सोयाबीनच्या क्षेत्रात २५०० हेक्टरने वाढ होऊन यंदा २ लाख ३० हजार ५१८ हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे. तुरीची ४६ हजार ९९७, मुगाची १२ हजार ४७२, उडिदाची ८ हजार ९२, ज्वारीची १० हजार २६, मक्याची २६२३, तिळाची २३१ हेक्टरवर पेरणी होईल असा अंदाज आहे.

महाबीजकडे ७३४२.१३ क्विंटल आणि खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे मिळून एकूण १ लाख १० हजार ८७४.९७ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये ज्वारीचे ७५१, मुगाचे ७४८, तुरीचे ३८७७, कपाशीचे १०९२, मक्याचे ११८, तिळाचे ५.८४, सोयाबीनच्या १ लाख ३ हजार ७३३ क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे.

खरीप हंगामासाठी विविध ग्रेडच्या ५८ हजार १२० टन रासायनिक खतांचा साठा मंजूर झाला आहे. यामध्ये युरिया १७ हजार २६०, डीएपी १० हजार ८१०, पोटॅश ४ हजार, एनपीके १७ हजार ३४०, सुपर फाॅस्फेट ८७१० टन खतांचा समावेश आहे. गतवर्षीचा १५ हजार ७९१ टन खतसाठा शिल्लक आहे असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...