बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार हेक्टरवर पेरणीचा अंदाज

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात सरासरीपेक्षा सुमारे दहा हेक्टरने कमी लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र सात लाख ४८ हजार ८०० हेक्टर असून यावर्षी सात लाख ३८ हजार ५४१ हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने बांधत नियोजन केले आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या वर्षी खरीप नियोजन अधिकारी स्तरावरच झाले आहे. बुलडाणा हा १३ तालुक्यांचा मोठा जिल्हा आहे. या जिल्हयात सोयाबीन हे प्रमुख पीक असून त्यानंतर कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी अशी पिके घेतली जातात. हंगामाच्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. यानुसार या वर्षी जिल्ह्यात सुमारे चार लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र सोयाबीन लागवडीखाली येणार आहे. राहिलेल्या क्षेत्रावर उर्वरित पिकांची लागवड केली जाईल. 

तालुकानिहाय नियोजित क्षेत्रफळाचा विचार केल्यास बुलडाणा तालुक्यात ५६,६२५, चिखलीत ८५ हजार ६३, मोताळा तालुक्यात ५५९०१, मलकापूरमध्ये ४२२११, खामगाव तालुक्यात ७५,०५०, शेगावमध्ये ४५,६९०, नांदुरा तालुक्यात ४८,५७८, जळगाव जामोदमध्ये ४०,८०१ सिंदखेडराजामध्ये ६७,३३०, देऊळगावराजा तालुक्यात ३९,६३०, मेहकरमध्ये ८५,४३६, लोणारमध्ये ५३,६३५ आणि संग्रामपूर तालुक्यात ४२५९० हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. 

जिल्ह्यात घाटावर व घाटाखाली असे भौगोलिक क्षेत्र आहे. आजवर घाटावरील तालुक्यांमध्ये सोयाबीन व घाटाखालील तालुक्यात कापूस अशी पीक पद्धती होती. मात्र मागील पाच ते सहा वर्षांत आता संपूर्ण जिल्हाभर सोयाबीनचे लागवड क्षेत्र विस्तारले आहे. गेल्या दोन हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांच्या उत्पादकतेला मोठा फटका बसला आहे. त्यातच यावर्षी तर संपुर्ण जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. अशा स्थितीत यंदा चांगला पाऊस झाला तरच शेतकरी पुन्हा नव्या जोमाने उभा राहू शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com