वाशीम जिल्ह्यात ९६ टक्क्यांवर पेरण्या

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

वाशीम  : मध्यंतरी पाऊस नसल्याने रखडलेल्या पेरण्या या अाठवड्यात पुन्हा सुरू झाल्या असून जिल्ह्यात ९६ टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्र अातापर्यंत लागवडीखाली अाले अाहे. येत्या दोन दिवसांत उर्वरित क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज वर्तविला जात अाहे.

या मोसमात वाशीम जिल्ह्यात सुरवातीपासून सार्वत्रिक व चांगला पाऊस झाला अाहे. परिणामी पेरण्या साधल्या आहेत. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ४ लाख ७०९ हेक्टर आहे. यापैकी अातापर्यंत तीन लाख ९६ हजार ७४४ हेक्टरवर पेरणी अाटोपली अाहे. या लागवडीपैकी सर्वाधिक सुमारे दोन लाख ८७ हजार हेक्टरवर सोयाबीनचीच लागवड झाली अाहे.

या हंगामात सोयाबीनला अपेक्षित भाव मिळालेला नाही. तुलनेने कपाशीचा दर ४५०० ते ५५०० पर्यंत मिळाला. पण बोंड अळीचे संकट येऊनही शेतकरी कपाशीकडे पाठ फिरवणार नाहीत, असे सर्वांना वाटत होते. मात्र वाशीम जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी साेयाबीन या पिकावरच भरवसा दाखवला. जिल्ह्यात कपाशीचे सरासरी क्षेत्र २९,८६५ हेक्टर असताना प्रत्यक्षात १८ हजार ५०५ हेक्टरवर लागवड झाली. हे सरासरीच्या ६२ टक्के अाहे.

जिल्ह्यात सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून तुरीची लागवड केली जाते. यावर्षी ५९हजार ७८० हेक्टरवर तुरीचा पेरा झाला अाहे. सोयाबीन, कपाशी, तूर या तीन पिकांनीच सर्वाधिक लागवड क्षेत्र व्यापले अाहे. जिल्ह्यात खरीपाचे सरासरी क्षेत्र ४ लाख ७०९ हेक्टर आहे. त्यापैकी तीन लाख ९६ हजार ७४४ हेक्टरवर पेरणी झाली अाहे. उर्वरित क्षेत्रही लवकरच लागवडीखाली येण्याची शक्यता कृषी विभागातील सूत्रांनी व्यक्त केली.

सोयाबीनचे पीक बऱ्याच ठिकाणी दीड महिना कालावधीचे झालेले असून लवकरच फुलोरावस्था सुरू होणार अाहे. लागवड झालेल्या पिकांमध्ये अांतरमशागती, निंदणी, डवरणी, फवारणी अशी कामे वेगाने होत अाहेत. जिल्ह्यातील पीकनिहाय पेरणी ः ज्वारी ५१८१, तूर ५९,७८०, मूग १०,२३३, उडीद १४,१२४, सोयाबीन २,८७,२६२, कापूस १८,४४९.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com