जळगाव जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी मजुरांचा तुटवडा
चंद्रकांत जाधव
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017
सध्या कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नाहीत. आमच्या परिसरात किंवा गावात अनेकदा जळगाव शहरातून ट्रॅक्‍टरने मोठे शेतकरी मजूर आणतात. मजुरीचे दर वाढले आहेत. तसेच उत्पादन खर्चही वाढू लागला आहे. मजूरटंचाई दिवाळीपर्यंत जाणवेल. 
- रवींद्र युवराज चौधरी, कापूस उत्पादक, आव्हाणे, जि. जळगाव.
जळगाव : पूर्वहंगामी कपाशीमध्ये सध्या भाद्रपदातील कडक उन्हामुळे जोमात बोंडे उमलत आहेत. एका वेचणीनंतर लागलीच चार-पाच दिवसांनी दुसरी वेचणी करावी लागत आहे. परंतु सध्या कापूस वेचणीसाठी मजुरांचा तुटवडा जाणवत असून, वेचणीसाठी शहरांमधून किंवा मोठ्या गावांमधून मजुरांना आणावे लागत असल्याचे चित्र आहेत. 
 
जळगाव, चोपडा, यावल, पाचोरा भागांत पूर्वहंगामी कपाशीची शेतं पांढरीशुभ्र दिसत आहेत. अधिक वेळ कापूस बोंडांमध्येच राहिला तर त्याचे वजन कमी होते. तसेच उंदीर व इतर प्राणी त्याचे नुकसान करतात. त्यामुळे बोंडे उमलल्यानंतर त्यांची लागलीच वेचणी करून घ्यावी लागते. परंतु सध्या मजूरटंचाई आहे. कुठल्याही गावात पुरेसे मजूर नाहीत. मजुरांचा तुटवडा असल्याने शेतकरी थेट तालुक्‍याच्या ठिकाणी जाऊन मजूर ट्रॅक्‍टर, रिक्षाने आणत आहेत. 
 
जळगाव शहरात गेंदालाल मिल परिसर, हरिविठ्ठल, आसोदा रस्ता भागातून महिला मजूर कापूस वेचणीकरिता आणले जात आहेत. सकाळी १० ते सायंकाळी पाच अशी त्यांची कापूस वेचणी कामाची वेळ असते. परंतु मजुरांना आणण्याचा वाहतूक खर्च संबंधित शेतकऱ्यांना करावा लागत आहे. अर्थातच यात उत्पादन खर्च वाढत आहे. अशीच स्थिती पाचोरा, यावल, चोपडा भागात आहे. लोणी, खर्डी, पंचक येथील शेतकऱ्यांना अडावद, धानोरा या मोठ्या गावांमधून ट्रॅक्‍टरने मजूरांना आणावे लागते. यावल तालुक्‍यातही यावल शहरातून वड्री, विरावली, साकळी (ता. यावल) भागांत मजूर जात असल्याची माहिती मिळाली. 
 
कापसाचे आगार म्हणून ओळख असलेल्या चोपडा येथे मजुरीचे दर वेगवेगळे आहेत. महिला मजुरास कापूस वेचणीसाठी किमान ८० रुपये रोज दिले जातात.  तोल पद्धतीनेही वेचणी केली जाते. तोल म्हणजेच दोन किलो कपाशीचा एक तोल. ८० रुपये किंवा १०० रुपये रोज देण्याऐवजी तोल पद्धतीने महिलांना कापूस वेचणीचे काम दिले जाते. यामुळे कापूस वेचणी लवकर होते. जेवढे तोल वेचले जातील त्यानुसार मजुरी दिली जाते.
 
तोलचे यंदाचे नवे दर अजून जाहीर झालेले नाहीत. परंतु मागील काळात सहा ते सात रुपये प्रतितोल या दरात अनेक ठिकाणी कापूस वेचणी झाली होती. सध्या उन्हाचा कडाका वाढत असल्याने सकाळीच कापूस वेचणीसाठी मजूर शेतात जातात. सकाळी ८.३० ते दुपारी २.३० पर्यंत कापूस वेचणीचे कामकाज चालते. 
 
 

इतर ताज्या घडामोडी
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...
परभणीत प्रतिक्विंटल टोमॅटो १२०० ते १८००...परभणी ः येथील कृषी उत्पन्न बाजार...
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
वाटाणा लागवड कधी करावी?वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगल्या...
नागपूर ३६.४ अंशांवरपुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ...
कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर वधारलेकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
जळगावात उडदाची आवक घटलीजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात...
नाशिकला टोमॅटोची आवक निम्म्याने घटलीनाशिक : नाशिक जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या...
उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये...नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी...
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...
समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार...घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...