agriculture news in marathi,lecture on goat farming, nagar, maharashtra | Agrowon

शाश्‍वत शेळीपालनातून साधावी प्रगती : मंडकमाले
टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018
नगर : शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय आहे. मात्र त्यात अतिशयोक्ती नको आहे. शेळीपालन करताना ते शाश्‍वत राहील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्या भागातील वातावरणाशीच निगडित असलेल्या शेळ्यांचे पालन करावे, असे आवाहन राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शेळी सुधार प्रकल्पाचे शास्त्रज्ञ संजय मंडकमाले यांनी केले. 
 
नगर : शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय आहे. मात्र त्यात अतिशयोक्ती नको आहे. शेळीपालन करताना ते शाश्‍वत राहील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्या भागातील वातावरणाशीच निगडित असलेल्या शेळ्यांचे पालन करावे, असे आवाहन राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शेळी सुधार प्रकल्पाचे शास्त्रज्ञ संजय मंडकमाले यांनी केले. 
 
नगर येथील सावेडी जॉगिंग पार्क मैदानावर सुरू असलेल्या सकाळ-अॅग्रोवन कृषी प्रदर्शनात शुक्रवारी पहिल्या दिवशी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शेळी सुधार प्रकल्पाचे शास्त्रज्ञ संजय मंडकमाले यांचे आधुनिक व व्यावसायिक शेळीपालन या विषयावर चर्चासत्र झाले.
 
मंडकमाले म्हणाले, की अलीकडच्या काळात शेळीपालनाकडे, विशेषतः बंदिस्त शेळीपालनाकडे कल वाढला आहे. मात्र मोठा खर्च करून शेळीपालन केले जात आहे. मात्र अनके ठिकाणी त्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे तरुणांनी कर्ज काढून मुळीच शेळीपालन करू नये. गोठ्यावरही जास्तीचा खर्च करू नये. शेळीचा चारा तसा फुकटच मिळणारा आहे. त्यामुळे चाऱ्यावरही अधिक खर्च करण्याची गरज नाही. इतर राज्यांतून विविध जातीच्या शेळ्या आणल्या जातात. मात्र त्या टिकत नाहीत, त्यामुळे आपल्या भागात ज्या जातीच्या शेळ्या आहेत, त्याचेच पालन करावे. बाजाराचा, उत्पादनाचा खर्चाचा अभ्यास करून शेळीपालन करणे गरजेचे आहे. या वेळी शेतकऱ्यांच्या शेळी व करडाचे व्यवस्थापन आदींबाबत प्रश्‍नांचे निरसन करण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...