नाशिकला डोंगराची काळी मैना विक्रीसाठी बाजारात

नाशिकला डोंगराची काळी मैना बाजारात
नाशिकला डोंगराची काळी मैना बाजारात

नाशिक : आदिवासी भागात सध्या मोठ्या प्रमाणावर रानमेवा उपलब्ध होतो आहे. करवंद, भोकर, काजूआंबा यांसारख्या जंगली फळांना आयुर्वेदिक महत्त्व असून शहरी भागात ग्राहक यांची खरेदी करतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हंगामातील करवंदांना 'डोंगराची काळी मैना' म्हणून शहरात लहान मोठ्यांमध्ये मागणी असते. हाच रानमेवा आदिवासी भागातील नागरिकांचे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे.  आदिवासी पाड्यावर पाण्याचा प्रश्नाबरोबर रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे. दोन वेळच्या दानापाण्यासाठी करवंद विक्रीतून मोठा हातभार लागत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरी या तालुक्यांमध्ये डोंगराळ भागात करवंदाची जाळी आहेत. या भागातील अदिवासी बांधव करवंदे व इतर रानमेवा विक्रीसाठी शहरात आणत आहेत. सध्या शहरातील पंचवटी, काळा राम मंदिर परिसराबरोबरच शहरातील मुख्य रस्त्यांवर विविध ठिकाणी करवंदांसह इतर रानमेव्याची विक्री होत आहे.  अशी आहे विक्रीची पद्धत : 

  • पळसाच्या पानापासून द्रोण बनवून या द्रोणामध्ये करवंदाची विक्री होते. 
  • त्यासाठी एक ग्लासचे माप ठरविले असून त्या आधारावर विक्री होते.
  • एक ग्लास करवंद - १० रुपये 
  • अंदाजे मापाचे वजन - १०० ग्रॅम
  • प्रतिकिलो १०० रुपयेप्रमाणे बाजारभाव 
  • दररोज ५०० ते १००० रुपयांची होते कमाई
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com