agriculture news in marathi,Notices to unauthorized crushing sugar factories | Agrowon

विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांना नोटिसा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 जानेवारी 2018

पुणे : राज्यात विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. "या कारखान्यांचे गाळप रोखण्याचा आमचा प्रयत्न नाही; मात्र कायदेशीर मुद्यांमुळे नोटिसा द्याव्या लागल्या," अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात यंदा भरपूर ऊस आहे. त्यामुळे १९० साखर कारखाने गाळपाला उतरतील असा अंदाज होता. प्रत्यक्षात आतापर्यंत १८२ कारखाने चालू झाले आहेत. त्यात ९८ सहकारी आणि ८४ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. अर्थात, मान्यता न घेता अजून तीन कारखाने राज्यात सुरू असल्याचा अहवाल प्रादेशिक साखर संचालकांनी पाठविला आहे.

पुणे : राज्यात विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. "या कारखान्यांचे गाळप रोखण्याचा आमचा प्रयत्न नाही; मात्र कायदेशीर मुद्यांमुळे नोटिसा द्याव्या लागल्या," अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात यंदा भरपूर ऊस आहे. त्यामुळे १९० साखर कारखाने गाळपाला उतरतील असा अंदाज होता. प्रत्यक्षात आतापर्यंत १८२ कारखाने चालू झाले आहेत. त्यात ९८ सहकारी आणि ८४ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. अर्थात, मान्यता न घेता अजून तीन कारखाने राज्यात सुरू असल्याचा अहवाल प्रादेशिक साखर संचालकांनी पाठविला आहे.

घृष्णेश्वर, संत एकनाथ आणि इंदिरा साखर कारखान्याच्या युनिटला बेकायदा गाळप सुरू असल्याबद्दल नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. राज्याचे साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांच्या आदेशानुसार या नोटिसा बजावल्या आहेत. औरंगाबाद भागातील संत एकनाथ कारखाना मूळ संचालक मंडळाकडून सचिन घायाळ यांना भाडेकराराने देण्यात आला होता. मात्र, या करारातील मुद्यांवर पुढे वाद होऊन कारखान्याची गाळप प्रक्रिया वादात अडकली आहे. कारखान्यातील वाद मिटलेला नसून गाळप परवानाही मिळालेला नाही.   

घृष्णेश्वर कारखाना आधीच्या कर्जदार बॅंकेने विकला आहे. युनिटची नोंदणी परवाना मात्र जुन्या नावाने असल्यामुळे पेच निर्माण झाला आहे. नव्या नावाची नोंदणी होऊन आयईएम नंबर म्हणजेच औद्योगिक उद्योजकता प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय गाळप परवाना देता येणार नाही, अशी भूमिका साखर आयुक्तालयाने घेतली आहे.

इंदिरा कारखाना सध्या अथनी शुगरने ताब्यात घेतला आहे. या कारखान्याचा परवानादेखील आयईएमच्या पेचात अडकला आहे. आयईएम दाखवा तरच गाळप परवाना मिळेल, असे या कारखान्याला सांगण्यात आले आहे.

साखर आयुक्तालयालाच खेचले न्यायालयात
विनापरवाना ऊस गाळप केल्याबद्दल नोटीस बजावल्याने भलतीच डोकेदुखी कारखाना प्रशासनाच्या मागे लागली आहे. दुसरीकडे कारखान्यांनी आयईएम नंबर आम्हाला दाखवताच गाळप परवाना तत्काळ दिला जाईल. तथापि, सध्याच्या स्थितीत कायद्यानुसार या कारखान्यांचे गाळप "विनापरवाना" ठरते आहे. त्यामुळे नोटिसा बजावण्याशिवाय पर्याय नव्हता, असे सांगण्यात आले. तर नोटीस दिलेल्या तीन पैकी एका कारखान्याने साखर आयुक्तालयालाच न्यायालयात खेचले आहे," अशी माहिती सूत्रांनी दिली.    

इतर बातम्या
पुण्यात कांदा, लसूण, फ्लॉवरच्या दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
'आणखी साखर तयार कराल, तर खड्ड्यात जाल'विटा, जि सांगली : पाणी आले म्हणून साखरेचे...
शिपायाने घातला शेतकऱ्यांना २२ लाखांला...वर्धा : पशुसंवर्धन विभागाच्या अनुदानावरील...
धान्य पट्ट्यात २०१८मध्ये ४३ शेतकरी...भंडारा : सिंचन, पर्यायी आणि व्यवसायिक पद्धतीविषयी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईचा प्रश्‍न गंभीरपुणे  : जिल्ह्यात पाणीटंचाईबरोबरच...
नांदेड जिल्ह्याला एक लाख क्विंटल...नांदेड : नांदेड जिल्ह्यात २०१९-२० मधील खरीप...
नांदेड जिल्ह्यात हमीभावाने ३८५७ क्विंटल...नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन मूल्य...
खानदेशात मे महिनाअखेरीस कापूस बियाणे...जळगाव  ः खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड...
नांदेड विभागात ७८ लाख टन ऊस गाळपनांदेड : प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड...
गडहिंग्लज, चंदगड तालुक्यात दहा गावांत...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर  : गडहिंग्लज आणि...
अनुकूल हवामानामुळे यंदा दर्जेदार...सांगली : यंदा बेदाणा निर्मितीसाठी अनुकूल हवामान...
एकतीस वर्षांतही संपले नाही गोसेखुर्द...भंडारा : राज्यकर्त्यांच्या निष्क्रीयतेमुळे...
शेती, शेतकऱ्यांचे हित जपणारे सरकार...फलटण, सातारा : ‘‘लोकसभा निवडणुकीकडे जगाचे...
बागायती कोल्हापूरचा दुष्काळग्रस्तांना...कोल्हापूर : पाणीटंचाईमुळे दूरवरून पाणी आणण्यासाठी...
नागपूर विभागातील प्रकल्पात  उरला १० टक्...नागपूर  : विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये...
यवतमाळ जिल्ह्यात नाफेडची तूर खरेदी बंदयवतमाळ  : गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात...
माझे लक्ष्य विधानसभा निवडणूक : राज ठाकरेमुंबई : लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, हे मी...
शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर...नाशिक : शेतकरी आंदोलनाचा केंद्रबिंदू राहिलेल्या...
जळगाव जिल्ह्यातील ६७ शाळांना सौर प्रकल्पजळगाव  ः  जिल्हा परिषद शाळांमधील...
नगर मतदारसंघात अठरा लाख मतदार बजावणार...नगर  : नगर मतदारसंघात १८ लाख ५४ हजार २४८...