agriculture news in marathi,onion auction begins at nashik road bazar, maharashtra | Agrowon

नाशिकरोड उपबाजारात सुरू होणार कांदा लिलाव
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 एप्रिल 2018
नाशिक  : नाशिक रोड सिन्नर फाटा येथील उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार उपबाजार समिती कार्यालयात सभापती शिवाजी चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. त्यात अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर (ता.१८) कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
नाशिक  : नाशिक रोड सिन्नर फाटा येथील उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार उपबाजार समिती कार्यालयात सभापती शिवाजी चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. त्यात अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर (ता.१८) कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
नाशिकरोडच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा उत्पादन घेतात. त्यांना जवळच्या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध व्हावी. यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने येथील सिन्नर फाटा उपबाजार आवारात कांदा विक्रीची व्यवस्था केली आहे. बाजार समिती सभापती शिवाजी चुंभळे व संचालकांनी व्यापारी, अडतदार यांची संयुक्त बैठक उपबाजार समिती कार्यालयात झाली.
 
या बैठकीस संचालक प्रवीण नागरे, युवराज कोठुळे, भाऊसाहेब खांडबहाले, कांदा व्यापारी रावसाहेब दळवी, भारत उगलमुगले, सतीश अंगळ, सुनील गवळी, शिवाजी दराडे, जाय केरळ, राजेंद्र सांगळे, भाऊसाहेब वराटे, सतीश भंडारी, बाजार समिती सचिव अरुण काळे, नियमन विभाग प्रमुख रघुनाथ धोंगडे, कार्यकारी अभियंता रामदास रहाडे, लालदास तुंगार, बनाजी वाघचौरे, बाळासाहेब पवळे, अशोक पाळदे, नंदू सोनवणे आदी उपस्थित होते.
 
या वेळी सभापती चुंभळे म्हणाले की, सिन्नर फाटा उपबाजार आवारात शेतकरी, अडतदार, व्यापाऱ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. व्यापाऱ्यांनी लिलावात खरेदी केलेला कांदा साठवणूक व  पॅकिंगची व्यवस्था करण्यात येईल. येत्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय बैठकीत झाल्याची माहिती चुंभळे यांनी दिली. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणण्याचे आवाहन उपसभापती संजय तुंगार यांनी या वेळी केले.  
 

सोमवार, बुधवार, शुक्रवार असे तीन दिवस कांदा लिलाव होईल. लिलाव पुकारण्यासाठी बाजार समिती कर्मचारी उपस्थित राहतील. येथे गोणी पद्धतीने कांदा विक्री होणार असून कांदा विक्री होताच त्याचे पैसे शेतकऱ्यांना तत्काळ मिळणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...